नवी दिल्ली - केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात करदात्यांना दिलासा दिला आहे. कोरोनाच्या उपचाराकरिता मित्र, कुटुंब, कंपनी किंवा इतर व्यक्तींकडून मिळणाऱ्या रकमेवर करात सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मिळणाऱ्या रकमेवरही करात सवलत देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
कोरोना महामारीमुळे करदात्यांना पॅन-आधार लिंक करण्यासह विविध सरकारी कामे मुदतीत करणे शक्य होत नाही. ही स्थिती लक्षात घेऊन प्राप्तिकर विभागाने पॅन- आधारला लिंक करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे.
हेही वाचा-ट्विटरकडून रवीशंकर प्रसाद यांचे अकाउंट तात्पुरते बंद; केंद्रीय मंत्र्यांनी 'हा' केला आरोप
कोरोनावरील उपचाराकरिता १० लाखापर्यंतच्या रकमेवर कर नाही!
जर करदात्याला कोरोनावरील उपचाराकिरता मित्र, कुटुंब किंवा काम करत असलेल्या कंपनी, संस्था किंवा हितचिंतकाकडून १० लाखापर्यंत मदत मिळाली तर त्यावर कर लागू होणार नाही. त्यासाठी सरकारकडून कायद्यात आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.
हेही वाचा-इंदिरा गांधीच्या भूमिकेत अवतरणार कंगना रणौत, 'इमर्जन्सी'ची तयारी सुरू!!
नियमांचे अनुपालन करण्याकरिता मुदतवाढ
- आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये शेवटच्या तिमाहीत डिडक्शन ऑफ टॅक्सचे स्टेटमेंट देण्याकरिता १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
- सर्टिफिकेट ऑफ टॅक्स डिडक्टेट सोर्सकरिता (टीडीएस) फॉर्म १६ भरण्याची मुदत १५ जुलैपर्यंत वाढविली आहे.
- विवाद से विश्वास (अतिरिक्त शुल्काशिवाय) योजनेकरिता ३० जून अंतिम मुदत होती. या योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
- विवाद से विश्वास (अतिरिक्त शुल्कासह) योजनेची मुदत ही ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.