ETV Bharat / business

आयजीएसटी मंत्रिगटाच्या संयोजकपदी सुशील मोदी यांची नियुक्ती - composition of the group of ministers

केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी मोबदला मिळण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे जीएसटी मोबदला वेळेवर देण्याची विनंती राज्यांनी  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे नुकतेच केली आहे. अशा स्थितीत आयजीएसटीच्या संयोजकपदी मोदी यांची निवड करण्यात आली आहे.

Sushil Modi
सुशील मोदी
author img

By

Published : Dec 11, 2019, 12:55 PM IST

नवी दिल्ली - बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची आयजीएसटी (एकत्रित वस्तू व सेवा कर) मंत्रिगटाच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी आयजीएसटी मंत्रिगटाच्या संयोजकपदी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे जबादारी होती.

केंद्र सरकारने आयजीएसटीच्या मंत्रिगटाच्या संयोजकपदातील बदलाची अधिसूचना मंगळवारी उशीरा रात्री काढली. या मंत्रिगटावर राज्यांच्या कर संकलनाची समस्या सोडविण्याची जबाबदारी आहे. त्याबाबत मंत्रिगट सीतारामन यांच्याकडे शिफारसी करणार आहे. आयजीएसटी मंत्रिगटाचे संयोजक सुशील मोदी यांना जीएसटीचे संकलन वाढविण्यासाठी शिफारसी कराव्या लागणार आहेत. आयजीएसटीच्या मंत्रिगटात राज्यांसह केंद्र सरकारचे मंत्री व अधिकारी आहेत.

हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक ७४ अंशाने वधारला; खासगी बँकेसह वित्तीय कंपन्यांचे शेअर तेजीत

केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी मोबदला मिळण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे जीएसटी मोबदला वेळेवर देण्याची विनंती राज्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे नुकतेच केली आहे. अशा स्थितीत आयजीएसटीच्या संयोजकपदी मोदी यांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा-देशाचा पहिला कॉर्पोरेट बाँड १२ डिसेंबरला होणार लाँच

काय आहे एकत्रित वस्तू व सेवा कर (इंटिग्रेटेड जीएसटी)
इंटिग्रेटेड जीएसटी हा दोन राज्यांमध्यो होणाऱ्या वस्तू व सेवांवर होणाऱ्या व्यवहारांवर लागू होणारा वस्तू व सेवा कर आहे. हा कर केंद्र सरकारकडून संकलित करण्यात येतो. त्यानंतर संबंधित राज्यांना कराचे वितरण करण्यात येते.

Intro:Body:

Dummy News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.