ETV Bharat / business

ई-सिगरेट बंदीच्या घोषणेवरून किरण मुझुमदार शॉ यांचा आक्षेप; सीतारामन यांनी 'हे' दिले उत्तर - Prakash Javdekar

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कमी सुधारणा करण्यात आल्याचीही टीका शॉ यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर केली होती. यावर उत्तर देताना सीतारामन यांनी ट्विट करून बाजू स्पष्ट केली आहे.

संपादित
author img

By

Published : Sep 19, 2019, 3:09 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी ई-सिगरेटवर बंदी घालण्याच्या निर्णयाची घोषणा केली. हा केंद्रीय अर्थमंत्र्यांचा अधिकार आहे का, असा सवाल बायोकॉनचे प्रमुख किरण मुझुमदार शॉ यांनी ट्विट करून उपस्थित केला. यावर निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत सडेतोड शब्दात उत्तर दिले आहे.

ई-सिगरेटवरील बंदीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित राहिल्याबद्दल किरण मुझुमदार शॉ यांनी सवाल उपस्थित केला. सीतारामन या केंद्रीय आरोग्य मंत्रालयासाठी काम करत नाहीत. गुटखाबंदीबाबत काय? अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्रालय कशी उपाययोजना करणार आहे?

शॉ यांच्या टीकेला निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून उत्तर दिले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, ती पत्रकार परिषद ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत होती. मंत्रिगटाची प्रमुख या नात्याने उपस्थित राहिल्याचे त्यावेळी सुरुवातीलाच सांगितले होते. हर्ष वर्धन हे आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी विदेशात गेले आहेत.

हेही वाचा-सरकारी बँकांच्या प्रमुखांची निर्मला सीतारामन घेणार बैठक; बँक विलिनीकरणाची होणार चर्चा

प्रकाश जावडेकर हे माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. निर्णयाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आरोग्य सचिवदेखील उपस्थित होते. तिथे शिष्टाचार असतात. तुम्हाला माहित आहेच की, सरकारी पत्रकार परिषदेत त्याचे पालन करण्यात येते.

हेही वाचा-नीरव मोदी लंडनच्या न्यायालयासमोर व्हिडिओ लिंकने राहणार उपस्थित

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कमी सुधारणा करण्यात आल्याचीही टीका शॉ यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर केली होती. यावर उत्तर देताना सीतारामन यांनी ट्विट करून आपली बाजू स्पष्ट केली आहे, अर्थमंत्री म्हणून... तुम्ही कदाचित निरीक्षण केले असेल...मी सातत्याने अर्थव्यवस्थेशी संबंधित सुधारणांवर काम करत आलेले आहे. त्यावर नियमितपणे बोलत आहे.

तरुणांचे आरोग्य टिकविण्यासाठी ई-सिगरेटवर बंदी घालण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.

हेही वाचा- शेअर बाजारात २०० अंशाने पडझड ; टीसीएस, आयसीआयसीआय बँकेंचे घसरले शेअर

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.