मुंबई - शेअर बाजारावर कोरोनाची दहशत कायम असल्याचे दिसून आले आहे. आजही शेअर मार्केटमध्ये ( Indian Share Market ) घसरण झाली असून सेन्सेक्स 1040 अंकानी घसरून 55,971 वर पोहचला आहे. तर निफ्टी 16,677 वर आहे. देशात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्याची भीतीने सर्वच क्षेत्रांमधील कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. एप्रिल नंतर शेअर मार्केट सातत्याने वधारत असलं तरी गेल्या काही दिवसात त्यामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.
ओमिक्रॉन हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉन, भारतासह जगातील इतर देशांमध्ये पसरला आहे. भारतात आतापर्यंत 143पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ओमिक्रॉन ही अर्थव्यवस्था आणि बाजार या दोन्हींसाठी मोठा धोका असल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. याचा अर्थ बाजारात मंदीचे सावट कायम राहण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा - Omicron Impact on BSE : ओमायक्रॉनचा धसका; शेअर बाजारात 949 अंशांची पडझड