नवी दिल्ली - एमएसएमई क्षेत्रातील थकित रक्कम देण्याकरता १ लाख कोटींचा निधी उभा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. हा निधी जमविण्यासाठी करण्यात येणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली. ते अॅसोचॅमच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलत होते.
एमएसएमई क्षेत्रातील अनेक उद्योगांची केंद्र सरकार, राज्य सरकार व सरकारी कंपन्यांकडे थकित रक्कम आहे. ही थकित रक्कम दिल्याने बाजारातील चलनाची तरलता येण्यास मदत मिळणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
हेही वाचा-देशात हायड्रोक्सीक्लोरोक्विनची कमतरता नाही :आयडीएमएम गुजरातचे चेअरमन
अमेरिका, इंग्लंड आणि चीनमधील कंपन्यांचा डाटा गोळा करून त्यांना देशात गुंतवणुकीकरता आमंत्रित करावे, असे गडकरींनी उद्योग संघटनेला सूचविले आहे.
हेही वाचा-सरकारच्या मदतीने अखिल भारतीय व्यापारी संघटनाच काढणार ई-कॉमर्स वेबसाईट
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे देशातील सर्व उद्योग व व्यसाय ठप्प आहेत. त्याचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे.