नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये व्यापारी वर्गाचा समावेश केला नाही. यामुळे अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) तीव्र निराशा व्यक्त केली आहे. व्यवसाय बंद करू, असा असा संघटनेने इशाराही दिला आहे.
आर्थिक पॅकेजमध्ये व्यापारी वर्ग आणि किरकोळ विक्रेत्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. देशातील ७ कोटी व्यापाऱ्यांची आर्थिक पॅकेजमध्ये दखल घेतली नसल्याने खूप निराश आहोत, असे सीएआयटीने म्हटले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी केली आहे.
हेही वाचा-केंद्र सरकारकडे राज्यांचा चार महिन्यांचा जीएसटी मोबदला थकित
काय म्हटले आहे सीएआयटीने?
- किरकोळ विक्रेत्यांशी सरकार सावत्र आईसारखी वागणूक देत आहे.
- प्रत्येक व्यापारी हा संतप्त आहे. त्यांनी आज विरोध व्यक्त केला आहे.
- खूप प्रतीक्षा असलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये व्यापाऱ्यांना पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आलेले आहे.
- सुमारे २० टक्के व्यापारी त्यांचा व्यवसाय गुंडाळतील असा अंदाज आहे. तर त्यांच्यावर अवलंबून असलेले १० टक्के व्यापारीही व्यवसाय बंद करतील, असे सीएआयटीने म्हटले आहे.
हेही वाचा-'आत्मनिर्भर' २० लाख कोटींच्या पॅकेजचा वित्तीय तुटीचा 'एवढा' वाढणार भार