नवी दिल्ली - किरकोळ बाजारातील महागाईची फेब्रुवारीत ६.५८ टक्के नोंद झाली आहे. ही आकडेवारी सरकारने आज जाहीर केली आहे. किरकोळ बाजारातील महागाई जानेवारीत ७.५९ टक्के होती.
गतवर्षी फेब्रुवारीत किरकोळ बाजारामधील महागाई ही २.५७ टक्के होती. किरकोळ बाजारातील महागाई जानेवारीत ७.५९ टक्के होती. हा गेल्या साडेपाच वर्षातील महागाईचा उच्चांक होता. पालेभाज्या, डाळी आणि प्रथिनयुक्त मांस आणि माशांचे दर वाढल्याने जानेवारीत महागाईने उच्चांक गाठला होता.