नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेतील महागाईने उच्चांक गाठला आहे. जूनमध्ये ३.१८ टक्के महागाईची नोंद झाली आहे. अन्नाच्या किमती वाढल्याने ही महागाई वाढली आहे.
किरकोळ बाजारपेठेतील महागाई ग्राहक किमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित आहे. हा सीपीआय मेमध्ये ३.०५ टक्के होता. तर गतवर्षी जूनमध्ये ४.९२ टक्के सीपीआय होता. चालू वर्षात जानेवारीपासून किरकोळ बाजारपेठेतील महागाई वाढत आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) आकडेवारीनुसार अन्नाची महागाई ही २.१७ टक्के होती. तर जूनमध्ये महागाई ही १.८३ टक्के होती.
अंडी, मासे, मांसच्या किमती मे महिन्याच्या तुलनेत वाढल्या आहेत. मात्र भाजीपाला आणि फळाच्या किमती कमी राहिल्याचे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक द्विमासीक पतधोरण जाहीर करताना किरकोळ बाजारपेठेतील महागाईच्या आकडेवारीचा विचार करते.