ETV Bharat / business

अर्थव्यवस्थेवरील विश्वास आणखी डळमळीत; आरबीआयचे सर्व्हेक्षण - बेरोजगारी

आरबीआयने मार्च २०१९ मध्ये सर्वेक्षण केले होते. त्यावेळी ३२.५ टक्के कुटुंबांना अर्थव्यवस्था वाईट झाल्याचे वाटत होते. तर हे प्रमाण वाढून जानेवारी २०२० मध्ये ५४.९ टक्के झाले आहे. यामधून अर्थव्यवस्थेची प्रतिमा वाईट झाल्याचे दिसून येत आहे.

RBI
आरबीआय
author img

By

Published : Feb 8, 2020, 8:05 PM IST

मुंबई - जास्तीत जास्त लोकांना भारतीय अर्थव्यवस्था वाईट होत असल्याचे वाटत आहे. ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणामधून दिसून आली आहे. सर्वेक्षणातील अर्ध्याहून अधिक कुटुंबांना देशातील अर्थव्यवस्थेचे साधारणपणे दिसणारे चित्र आणखी वाईट झाल्याचे वाटते.

आरबीआयने मार्च २०१९ मध्ये सर्वेक्षण केले होते. त्यावेळी ३२.५ टक्के कुटुंबांना अर्थव्यवस्था वाईट झाल्याचे वाटत होते. तर हे प्रमाण वाढून जानेवारी २०२० मध्ये ५४.९ टक्के झाले आहे. यामधून अर्थव्यवस्थेची प्रतिमा वाईट झाल्याचे दिसून येत आहे.

सर्वेक्षणामधील २७.१ टक्के जणांना अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारल्याचे वाटते. तर १८ टक्के कुटुंबांना स्थिती तशीच राहिल्याचे वाटते. आरबीआयने हे सर्व्हेक्षण देशातील १३ शहरांमध्ये केले आहे. यामध्ये ५,३८९ कुटुंबांतून माहिती घेण्यात आली. यामध्ये अहमदाबाद, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद आदी शहरांचा समावेश आहे.

हेही वाचा - ऑटो एक्स्पो - मर्सिडिजमध्ये स्वयंपाकघर, बेडसारख्या सुविधा; एवढी आहे किंमत

  • रोजगार

सर्वेक्षणातील ४८.४ टक्के लोकांना पुढील वर्षी रोजगाराची स्थिती सुधारेल असे वाटते. तर सुमारे ५७ टक्के जणांना मागील वर्षाच्या तुलनेत स्थिती वाईट झाल्याचे म्हटले आहे. बेरोजगारी ही भारतीय अर्थव्यवस्थेमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारी आकडेवारीनुसार, वर्ष २०१७-१८ मधील बेरोजगारीचे प्रमाण हे गेल्या ४० वर्षात सर्वाधिक आहे.

हेही वाचा-VIDEO- केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डुलक्या

  • महागाई

गेल्या वर्षी किमती आणि खर्च वाढल्याचे बहुतांश कुटुंबांनी म्हटले आहे. तर येत्या वर्षात अधिक खर्च होणार असल्याचे बहुतांश कुटुंबांनी अपेक्षित धरले आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकाचे (महागाई) प्रमाण हे ७.३ टक्के होते.

Intro:Body:

Dummy business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.