मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्था मंदावत असल्याचे पाहून फेब्रुवारीमध्ये रेपो दर कमी केले. कमी केलेला रेपोदर हा योग्यवेळी घेतलेला निर्णय होईल, हे सिद्ध होईल, असा विश्वास भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. ते 'इकॉनॉमिक कॉन्कलेव्ह' कार्यक्रमात बोलत होते.
चालू वर्षात आरबीआयने पाचवेळा रेपो दरात एकूण १.३५ टक्क्यांची कपात केली आहे. त्याबाबत विचारले असता शक्तिकांत दास म्हणाले, सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने योग्यवेळी कृती केली आहे. आम्ही थोडेसे वेळेच्या आधी कृती केली आहे. अर्थव्यवस्थेचा विकासदर कमी होत असल्याचे फेब्रुवारीमध्ये पाहिले. त्यामुळे रेपो दरात कपात करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१; उद्योग प्रतिनिधींशी निर्मला सीतारामन करणार चर्चा
भारतीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीत रेपो दरात कपात केल्याने बाजाराला आश्चर्याचा धक्का बसला होता. डिसेंबरमध्ये रेपो दर स्थिर ठेवूनही बाजाराला आश्चर्यचकित का झाले, हे माहित नाही. रेपो दरातील कपातीचा निर्णय होता. हे तुम्ही सर्वांनी स्वीकारले त्याबद्दल आभारी आहे. पतधोरण समितीचा निर्णय योग्य होता, हे घडणाऱ्या घटनांनी सिद्ध होईल, असेही शक्तिकांत दास म्हणाले.
हेही वाचा -घाऊक बाजारातील महागाईत नोव्हेंबरमध्ये ०.५८ टक्क्यांची वाढ
दरम्यान चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर (जीडीपी) ५ टक्के नोंदविण्यात आला आहे. तर दुसऱ्या तिमाहीत त्याहून कमी म्हणजे ४.५ टक्के जीडीपीची नोंद झाली आहे. हा गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी विकासदर आहे.