ETV Bharat / business

पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर आरबीआयने व्यवस्थेत 'हा' केला बदल - सहकारी बँक घोटाळा

भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व सहकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रक पाठवून ई-मेलऐवजी वेबवर आधारित केंद्रीय व्यवस्थेचा वापर करण्यास सांगितले आहे.

संग्रहित- भारतीय रिझर्व्ह बँक
author img

By

Published : Oct 12, 2019, 1:31 PM IST

Updated : Oct 12, 2019, 3:27 PM IST

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेतील ४ हजार कोटींचा घोटाळा उघडकीला आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) महत्त्वपूर्ण बदल केला आहे. सहकारी बँकांकडून आरबीआयला रोज माहिती देणाऱ्या व्यवस्था (डेली रिपोर्टिंग सिस्टिम) ही ई-मेलच्या ऐवजी ऑनलाईन पोर्टलवर आधारित करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व सहकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रक पाठवून ई-मेलऐवजी वेबवर आधारित केंद्रीय व्यवस्थेचा वापर करण्यास सांगितले आहे. सध्या आरबीआयकडून बेसिक स्टॅस्टिकल रिटर्न (बीएसआर) या यंत्रणेचा वापर केला जातो. त्याऐवजी आरबीआयकडून बँकिंग पायाभूत सुविधांसाठी असलेल्या केंद्रीय माहिती व्यवस्थेचा (सीआयएसबीआर) वापर करण्यात येणार आहे. या यंत्रणेत सहकारी बँकांना सर्व माहिती सीआयएसबीआयच्या पोर्टलवरून एकाच फॉर्ममधून ऑनलाईन भरावी लागणार आहे. यापूर्वी सहकारी बँकांकडून वेगवेगळ्या कागदपत्रांमधून आरबीआयला माहिती दिली जात होती.

हेही वाचा-पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात भारताची व्यापारी तूट कमी करण्यावर चर्चा

सहकारी बँकांकडून भरलेली माहिती तपासण्यासाठी सीआयएसबीकडून संबंधित सहकारी विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे. आरबीआयने बँकांची जुनी माहिती यापूर्वीच सीआयएसबीमध्ये संग्रहित केली आहे. सहकारी बँकांना पोर्टलमधून लॉग इन करून देण्यासाठी आरबीआयने नोडल ऑफिसरचीही नियुक्ती केली आहे.

हेही वाचा- औद्योगिक उत्पादनाच्या वृद्धीदरात ऑगस्टमध्ये १.१ टक्क्यांची घसरण; गेल्या सात वर्षातील नोंदविला निचांक

Intro:Body:

Dummy

Conclusion:
Last Updated : Oct 12, 2019, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.