ETV Bharat / business

नव्या वर्षातही महागाईची टांगती तलवार राहणार कायम!

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भूतकाळातील उदाहरण देत महागाईत आणखी वाढ होणार असल्याचा इशारा दिला आहे. आरबीआयचे  द्विमासिक पतधोरण जाहीर केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Representative Image
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Feb 7, 2020, 12:36 PM IST

हैदराबाद - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २०१९ मधील महागाई वाढण्याचे खापर कांदे भाववाढीवर फोडले आहे. प्रत्यक्षात किरकोळ बाजारपेठेत सर्व वस्तुंचे दर डिसेंबरमध्ये ७ टक्क्यांनी वाढले आहेत. तर कांद्याचे दर देशातील बहुतांश बाजारपेठेत प्रति किलो २०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भूतकाळातील उदाहरण देत महागाईत आणखी वाढ होणार असल्याचा इशारा दिला आहे. आरबीआयचे द्विमासिक पतधोरण जाहीर केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, येत्या आठवड्यात आणि महिन्यांत कांद्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण कांद्याच्या पुरवठ्यात सुधारणा होत आहे. डाळी, औषधे व दूरसंचार कंपन्यांचे वाढलेले शुल्क यांच्यामुळे किरकोळ बाजारातील किंमतीवर दबाव राहणार आहे.

हेही वाचा-आरबीआय म्हणते, कोरोना रोगाचा पर्यटनासह व्यापारावर होणार परिणाम

सर्वोच्च न्यायालयाने थकित शुल्क केंद्रीय दूरसंचार विभागाला देण्याचे दूरसंचार कंपन्यांना ऑक्टोबर २०१९ मध्ये आदेश दिले आहेत. त्यानंतर दूरसंचार कंपन्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये रिचार्जचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला. अंदाजित आकडेवारीनुसार दूरसंचार कंपन्यांना १.४७ लाख कोटी रुपये सरकारला द्यावे लागणार आहेत.

हेही वाचा-...तर कोरोनाचा देशातील वाहन उद्योगावरही परिणाम होण्याची शक्यता

डिसेंबर २०१९ मध्ये महागाईचा भडका-

किरकोळ बाजारपेठेबरोबर घाऊक बाजारपेठेतील महागाई डिसेंबरमध्ये भडकल्याचे दिसून आले आहे. डिसेंबरमध्ये घाऊक बाजारपेठेतील महागाईची २.५९ टक्के नोंद झाली आहे. तर नोव्हेंबरमध्ये घाऊक बाजारपेठेतील महागाई ही ०.५८ टक्के होती.

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.