ETV Bharat / business

'वाहन उद्योगाला वेळीच पाठबळ दिले नाही तर १० लाख लोकांचे जातील रोजगार..' - Auto sector

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्ष नेता असेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे, असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : Aug 31, 2019, 5:17 PM IST

Updated : Aug 31, 2019, 6:13 PM IST

पुणे - राज्यातील रोजगार बाहेरील राज्यात जात आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. वाहन उद्योगाला वेळीच पाठबळ दिले नाही तर 10 लाख लोकांचे रोजगार जातील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते शहरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ५ टक्के असल्याचे राष्ट्रीय एनएसएसओने जाहीर केले आहे. मागील पाच वर्षांपासून विकासदराचे आकडे सतत घसरत आहेत. सरकार ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न दाखवित आहे. मात्र, राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्याबाबत सरकार हे माहिती देत नाही. नागपूरमधील मिहान हा उत्कृष्ट औद्योगिक प्रकल्प आघाडी सरकारने विकसित केला. तेथील ८ उद्योगपतींनी आता सरकारला जागा परत केल्या आहेत. याची जबाबदारी निश्चित करावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा-सरकारने जाहीर केलेल्या सुधारणांनी वाहन उद्योगाला मदत होईल - उद्योजकांच्या प्रतिक्रिया

पुढे चव्हाण म्हणाले, की सरकारने १० राष्ट्रीयकृत बँकांचे विलिनीकरणाचा शुक्रवारी निर्णय घेतला आहे. मात्र, त्यामधून केवळ वित्तीय चालना देण्याचा आभास निर्माण केला जात आहे. मंदी असल्याने काही कंपन्यांनी वृत्तपत्रात जाहिराती देऊन सरकरचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारच्या मेक इन इंडियाचे काय झाले हे सरकार सांगण्यास तयार नाही.

हेही वाचा-मंदीचे सावट.. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये १० टक्क्यांची घसरण, गेल्या ५२ आठवड्यातील निचांक

अलमट्टी धरणाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी बिगर राजकीय समितीची गरज-

सांगली आणि कोल्हापूर येथील पूर परिस्थितीमुळे सरकारचा गलथनपणा उघडकीस आल्याची पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर टीका केली. नागरिक पुरात अडकलेले असताना सांगली आणि कोल्हापूरचे पालकमंत्री पक्षाच्या मेळाव्यात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेत व्यग्र होते. त्यामुळे सांगली कोल्हापूर पूर परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. तेथील नुकसान टाळता आले नाही. त्यामुळे कोल्हापूर शहराला अर्धवेळ पालकमंत्री नको तर पूर्णवेळ पालकमंत्री द्यावा, अशी तेथील लोकांची मागणी आहे. तसेच अलमट्टी धरणाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एक बिगर राजकीय समिती स्थापन करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.

हेही वाचा-चिंताजनक! जीडीपी दुसऱ्या तिमाही दरम्यान घसरून ५.७ टक्के राहणार ; नोमूराचा अहवाल

मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाचे काम करावे-

दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत धाडसत्र सुरू आहे. इतर सर्व पक्ष संपून टाकायचे आणि एकाच पक्षाची सत्ता आणायचे, अशी भूमिका भाजपने घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीविरोधात याविरोधात लढायचे असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यासह भाजपचा छुपा पाठिंबा होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्षनेता असेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे, असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

काँग्रेसच्या नेत्यांना धमक्या देऊन भाजपमध्ये घेतले-

देशभरात जे विरोधक भाजपात येणार नाही त्यांच्याविरोधात चौकशी लावली जात आहे. चौकशी लावू, अशी धमकीही त्यांना दिली जात आहे. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाच प्रकारे धमक्या देऊन भाजपमध्ये घेतले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

Intro:देशाच्या अर्थव्यवस्थचा विकासदर 5 टक्के असल्याचे nsso ने जाहीर केले आहे...मागील पाच वर्षांपासून विकासदराचे आकडे सतत घसरत आहेत..5 ट्रेलियान डॉलरचे स्वप्न सरकार दाखवत आहे..

राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली..वाहनउद्योगात प्रचंड मंदी आहे..वाहन उद्योगाला वेळीच पाठबळ दिले नाही तर 10 लाख लोकांचे रोजगार जातील...
काही कंपन्यांनी वृत्तपत्रात जाहिराती देऊन सरकरचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत..
या सर्व पार्श्वभूमीवर सरकारच्या मेक इन इंडियाचे काय झाले हे सरकार सांगण्यास तयार नाही..
महाराष्ट्रातुन रोजगार बाहेर राज्यात जात आहे..या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ठोस उपाययोजना कराव्यात...Body:सांगली आणि कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीमुले सरकारचा गलथनपणा उघडकीस.नागरिक पुरात अडकलेले असताना सांगली आणि कोल्हापूरचे पालकमंत्री पक्षाच्या मेळाव्यात होते..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत व्यस्त होते..त्यामुळे सांगली कोल्हापूर पूरपरिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आणि नुकसान टाळता आले नाही..त्यामुळे कोल्हापूर शहराला अर्धवेळ पालकमंत्री नको तर पूर्णवेळ पालकमंत्री द्याव्या अशी मागणी तेथील लोकांची आहे...तसेच अलमट्टी धरणाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एक बिगर राजकीय कमिटी स्थापन करण्यात यावी..

दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत धाडसत्र सुरू आहे...इतर सर्व पक्ष संपून टाकायचे आणि एकाच पक्षाची सत्ता आणायचे अशी भूमिका भाजपने घेतल्याचे दिसून येत आहे...
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीविरोधात याविरोधात आम्हाला लढायचे आहे...Conclusion:लोकसभा निवडणुकापासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यासह भाजपाचा छुपा पाठिंबा होताच. आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्ष नेता असेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
देशभरात जे विरोधक भाजपात येणार नाही त्यांच्याविरोधात चौकशी लावली जाते आहे. चौकशी लावू अशी धमकीही त्यांना दिली जाते आहे. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाचप्रकारे धमक्या देऊन भाजपात घेतले जाते आहे असाही आरोप चव्हाण यांनी केला.

आघाडी सरकारच्या काळात देखील किरकोळ घोटाळे होत होते. त्यावेळी घोटाळेबाजावर कारवाई केली. पण यांच्या कार्यकाळात तर लाखो कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. तसेच अनेक भागांत घोटाळ्यांची प्रकरणं पुढे येत आहे. त्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची संबधितावर कारवाई केली जात नाही. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही बॅंकाचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून काय साध्य होणार हे अद्याप पर्यंत योग्य स्पष्टीकरण सरकारकडून दिले गेले नाही असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
Last Updated : Aug 31, 2019, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.