ETV Bharat / business

'जीडीपीचे आकडे हे सरकारच्या चुकीच्या आर्थिक व्यवस्थापनाचे समालोचन' - pre lockdown period GDP

जीडीपीची ही आकडेवारी टाळेबंदीपूर्वीची आहे. केवळ शेवटच्या सात दिवसात टाळेबंदी लागू केली होती, असेही चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पी. चिदंबरम
पी. चिदंबरम
author img

By

Published : May 29, 2020, 7:52 PM IST

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये शेवटच्या तिमाहीत विकासदर ३.१ टक्के राहिल्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर निशाणा साधला. जीडीपीची जाहीर झालेली आकडेवारी म्हणजे सरकारने केलेल्या चुकीच्या आर्थिक व्यवस्थापनाचे समालोचन असल्याची चिदंबरम यांनी टीका केली.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या आर्थिक कामगिरीचा समाचार घेतला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक विकासदर हा ४ टक्क्यांहून कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, त्याहून अधिक वाईट घसरून विकासदर ३.१ टक्के राहिल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • We had forecast that GDP for Q4 will touch a new low at below 4 per cent

    It has turned out to be worse at 3.1 per cent.

    — P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संबंधित बातमी वाचा-आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये ४.२ टक्के विकासदर; गेल्या ११ वर्षातील नीचांक

जीडीपीची ही आकडेवारी टाळेबंदीपूर्वीची आहे. केवळ शेवटच्या सात दिवसात टाळेबंदी लागू केली होती, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चला देशभरात टाळेबंदी लागू केली होती.

  • It is a telling commentary on the economic management of the BJP government.

हेही वाचा-आठ मूलभूत क्षेत्रांच्या वृद्धीदरात ३८.१ टक्क्यांची घसरण

ही आहे जीडीपीची आकडेवारी-

आर्थिक वर्ष २०१९-२० मधील शेवटच्या तिमाहीत ३.१ टक्के विकासदराची नोंद झाली आहे. हा गेल्या सहा वर्षामध्ये असलेल्या तिमाहीमध्ये सर्वात कमी विकासदर आहे. मागील आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये ५.७ टक्के विकासदराची नोंद झाली आहे.

आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ६.१ टक्के विकासदराची नोंद झाली होती. तर आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ४.२ टक्के विकासदर नोंदविण्यात आला आहे. हा गेल्या ११ वर्षातील सर्वात कमी विकासदर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.