ETV Bharat / business

आणखी नोटांबदी करण्याची 'या' वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली गरज - 2000rs note

देशाच्या चलन व्यवस्थेत सुमारे एक तृतियांश नोटा २ हजार रुपयांच्या आहेत. मात्र, त्याची साठेबाजी केली जात आहे. त्यामुळे त्याचा व्यवहारात फारसा वापर होत नाही.

संग्रहित -
author img

By

Published : Nov 8, 2019, 4:43 PM IST

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने ५०० व २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. या नोटांची साठेबाजी केली जात आहे. त्यामुळे २ हजार रुपयांची नोट बंद करावी, असे मत माजी केंद्रीय अर्थव्यवहार सचिव एस. सी. गर्ग यांनी व्यक्त केले. नोटाबंदीच्या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच गर्ग यांनी हे विधान केले आहे.

एस. सी. गर्ग म्हणाले, अजूनही व्यवस्थेत मोठी रोकड आहे. २ हजार रुपयांच्या नोटांचा साठा केला जात असल्याचे पुरावे आहेत. जगभरात डिजीटल व्यवहारांचे प्रमाण वाढत आहे. भारतामध्ये त्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, ही गती खूप कमी आहे. चीनमध्ये ८७ टक्के व्यवहार हे बिगर रोखीने होतात. तर भारतात बिगर रोखीच्या व्यवहाराचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे.

हेही वाचा-मूडीजने घटविले देशाचे पतमानांकन; आर्थिक जोखीम वाढवित असल्याचे नोंदविले निरीक्षण

देशाच्या चलन व्यवस्थेत सुमारे एक तृतियांश नोटा २ हजार रुपयांच्या आहेत. मात्र, त्याची साठेबाजी केली जात आहे. त्यामुळे त्याचा व्यवहारात फारसा वापर होत नाही. बँकेत रक्कम जमा करताना त्यावर शुल्क असू नये, अशी त्यांनी गरज व्यक्त केली. तसेच १० रुपयांहून कमी किमतीच्या नोटा नसाव्यात, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा-एसबीआयकडून ठेवीवरील व्याजदरात मोठी कपात; कर्जाचे दर अंशत: स्वस्त

वित्तीय मंत्रालयातून बदली करण्यात आल्यानंतर गर्ग यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्यांच्याकडे सध्या विदेश चलन वितरण विभागाची जबाबदारी आहे.

Intro:Body:

Former department of economic affairs (DEA) secretary S.C. Garg claimed that the Rs 2,000 notes may not have been in circulation much now as they have been hoarded by people.

New Delhi: Endorsing the estimates of Rs 2,000 notes shrinking in circulation, former department of economic affairs (DEA) secretary S.C. Garg has said that the high-value notes can be demonetised without causing any disruption.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.