ETV Bharat / business

बेरोजगारीचा 'एनएसएसओ'चा अहवाल चुकीचा  - रवीशंकर प्रसाद

रवीशंकर प्रसाद म्हणाले, की जर तुम्हाला १० निकष दिले तर अर्थव्यवस्था चांगली काम करत असल्याचे दिसेल. मात्र, यामधील एकही निकष एनएसएसओच्या अहवालात नव्हता. त्यामुळे तो अहवाला चुकीचा असल्याचे माझे म्हणणे आहे.

रवीशंकर प्रसाद पत्रकार परिषदेत बोलताना
author img

By

Published : Oct 12, 2019, 8:09 PM IST

मुंबई - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेची लक्षणे दिसत नसल्याचे केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रीय नमुने सर्व्हे कार्यालयाने (एनएसएसओ) दिलेली बेरोजगारीची आकडेवारी चुकीची असल्याचाही त्यांनी दावा गेला. ते मुंबईमध्ये भाजपच्या प्रचार मोहिमेसाठी आले होते.

काही लोक संघटितपणे सरकारविरोधात काम करत आहेत. त्यांनी बेरोजगारीवरून लोकांची दिशाभूल केली, असा रवीशंकर प्रसाद यांनी दावा केला. पुढे ते म्हणाले, की जर तुम्हाला १० निकष दिले तर अर्थव्यवस्था चांगली काम करत असल्याचे दिसेल. मात्र, यामधील एकही निकष एनएसएसओच्या अहवालात नव्हता. त्यामुळे तो अहवाला चुकीचा असल्याचे माझे म्हणणे आहे.

मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांचा एका दिवसाचा गल्ला १०० कोटींपेक्षा जास्त आहे, तेव्हा अर्थव्यवस्था संकटात कशी, असा उलट सवाल केंद्रीय कायदेमंत्री प्रसाद यांनी केला.

एनएसएसओच्या अहवालानंतर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकावर बेरोजगारीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला होता. नुकतेच नीती आयोगाचे चेअरमन राजीव कुमार यांनी तो अहवाल अंतिम नव्हता, असे म्हटले होते. तसेच तो अहवाल हा कच्चा आराखडा होता, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या ४५ वर्षात सर्वात अधिक २०१७ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण झाल्याचे एनएसएसओने अहवालात म्हटले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.