नवी दिल्ली - देशातील वाहन उद्योगात मंदी नाही. तरीही केवळ सरकारकडून पॅकेज मिळण्यासाठी वाहन उद्योग एकत्रित अश्रू गाळत असल्याची टीका व्यापारी संघटना सीएआयटीने केली आहे.
जीएसटीचे वाढलेले प्रमाण, कृषी क्षेत्रातील संकट व कमी वित्तपुरवठा या कारणांनी विक्री कमी झाल्याचे वाहन उद्योगाकडून सांगण्यात येत आहे. मात्र वाहन उद्योगात मंदी नाही. ते फक्त सरकारकडून पॅकेज मिळविण्यासाठी मंदी असल्याचे सांगत आहेत, असा आरोप अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे महासचिव प्रविण खंडलेवाल यांनी केला.
हेही वाचा-टाटा मोटर्सला विदेशातील व्यवसायातही फटका, वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये ३२ टक्क्यांची घट
पुढे ते म्हणाले, नव्या लाँचिंग केलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात येत आहे. त्यातून वाहन उद्योगात मंदी नसल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा-मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर नितीन गडकरी म्हणतात, ही कठीण वेळही निघून जाईल !
वाहन उद्योगात मंदी-
वाहन उद्योगातील मंदी सलग १० व्या महिन्यातही सुरुच राहिली. प्रवासी वाहनांच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ३१.५७ टक्के घसरण झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये २ लाख ८७ हजार १९८ वाहनांची विक्री झाली होती. चालू वर्षात ऑगस्टमध्ये १ लाख ९६ हजार ५२४ वाहनांची विक्री झाली आहे.
सरकारने आर्थिक सुधारणांची घोषणा करूनही वाहन उद्योगांवरील मंदीचे सावट कायम आहे. महिंद्रा अँड महिंद्राने चालू तिमाहीत ८ ते १७ दिवसापर्यंत देशातील प्रकल्प बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले. विक्रीच्या तुलनेत उत्पादनाचा मेळ घालण्यासाठी प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-वाहन उद्योगावर मंदीचे सावट : महिंद्राचा उत्पादन प्रकल्प १७ दिवसापर्यंत राहणार बंद