कोलकाता - पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भाष्य केले आहे. अमेरिका-इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या खनिज तेलाच्या किमतीमुळे चिंताग्रस्त होण्याची गरज नाही, असे प्रधान म्हणाले. ते सीआयआयच्या कार्यक्रमात बोलत होते.
केंद्र सरकारने थांबा आणि वाट पाहा, असे धोरण स्वीकारले आहे. चिंतेची गरज नाही, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
हेही वाचा-सोन्याच्या तस्करीत वाढ; 'हे' आहे कारण
पर्शियन गल्फमध्ये भू-राजकीय कारणांमुळे तणाव निर्माण झाल्याचे यावेळी प्रधान यांनी सांगितले. जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाची कमतरता नाही. गेली काही दिवस खनिज तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, दोन दिवसांपासून खनिज तेलाचे दर उतरल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-एटीएममधून १०० रुपयाऐवजी निघाल्या ५०० रुपयांच्या नोटा, अन्...