ETV Bharat / business

'दिल्लीतील हिंसेचा गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम नाही' - investors india

निर्मला सीतारामन म्हणाल्या, नुकताच रियाधमध्ये झालेल्या मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत भारतामधील घटनांवर चिंता व्यक्त झाली नाही. काही महत्त्वाच्या गुंतवणूकदारांनी भारतामध्ये प्रातिनिधिक स्वरुपात कार्यालये सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

File Photo- Nirmala Sitaraman
संग्रहित - निर्मला सीतारामन
author img

By

Published : Feb 28, 2020, 12:11 PM IST

गुवाहाटी - भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणांचे हिरवे कोंब (ग्रीन शूट्स) दिसत असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. दिल्लीमधील हिंसेचा आणि सध्या देशात सुरू असलेल्या सीएएविरोधातील आंदोलनाचा गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या माध्यमांशी गुरुवारी बोलत होत्या.

दिल्लीमधील हिंसेत सुमारे ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० जण जखमी झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, नुकताच रियाधमध्ये झालेल्या मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत भारतामधील घटनांवर चिंता व्यक्त झाली नाही. काही महत्त्वाच्या गुंतवणूकदारांनी भारतामध्ये प्रातिनिधिक स्वरुपात कार्यालये सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांची अद्याप, देशात कार्यालये नाहीत. विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झालेला नाही.

हेही वाचा-व्होडाफोन आयडियाने सरकारकडे केली 'ही' चक्रावून टाकणारी मागणी

नुकताच घोषित करण्यात आलेल्या नॅशनल इन्फास्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये गुंतवणूकदारांना रस आहे. गुंतवणूकदारांना भारतामध्ये आणखी रस आहे.

सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने ठोस पावले उचलल्याचे त्यांनी मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर बोलताना सांगितले. अर्थव्यस्थेची स्थिती सकारात्मकतेडे वळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-कोरोनाची धास्ती: चिकन ७० टक्क्यांनी स्वस्त, ५० टक्क्यांनी घटली विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.