ETV Bharat / business

अर्थमंत्रालयातून मला काढण्याची निर्मला सीतारामन यांची इच्छा होती- सुभाष चंद्र गर्ग यांचा गौप्यस्फोट - Subhash Chandra Garg on VRS news

सुभाष चंद्र गर्ग यांनी अर्थ मंत्रालयातून बदली झाल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबद्दलची नाराजी व बदलीचे कारण ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

सुभाष चंद्र गर्ग
सुभाष चंद्र गर्ग
author img

By

Published : Oct 31, 2020, 7:36 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्रालयाचे माजी सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. सीतारामन यांच्यामुळेच आपली अर्थमंत्रालयातून बदली झाली होती, असा गौप्यस्फोट गर्ग यांनी केला. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर गर्ग यांची तिसऱ्या आठवड्यातच अर्थ मंत्रालयातून उर्जा विभागात बदली करण्यात आली होती.

सुभाष चंद्र गर्ग यांनी अर्थ मंत्रालयातून बदली झाल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबद्दलची नाराजी व बदलीचे कारण ब्लॉगमध्ये लिहिले आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे व्यक्तिमत्व आणि बुद्धिहून सीतारामन या वेगळ्या असल्याचे गर्ग यांनी म्हटले आहे.

काय म्हटले गर्ग यांनी ब्लॉग पोस्टमध्ये?

त्यांचा (निर्मला सीतारामन) माझ्यावर विश्वास नव्हता. आरबीआयच्या भांडवलाची पुनर्रचना आणि बिगर बँकांना पॅकेज देणे, अंशत: कर्ज हमी योजना, आयआयएफसीएलसारख्या बिगर बँकांच्या भांडवलीकरण या मुद्द्याबाबत मतभेद होते, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळेच वैयक्तिक संबंधही कटू झाले. तसेच कार्यालयातील संबंधही अनुत्पादक झाले होते. ५ जुलैला अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जून २०१९ मध्ये सीतारामन यांना कार्यालयातून काढण्याची इच्छा होती. मात्र, कोणत्या कारणामुळे सरकारने त्यांची विनंती तातडीने स्वीकारली नाही, हे माहित नाही. सरकारमधून सामान्यस्थितीत निवृत्त होण्याची इच्छा होती. मात्र, स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली.

गर्ग यांच्या पोस्टवर केंद्रीय अर्थमंत्रालय आणि सीतारामन यांच्या कार्यालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, गर्ग यांनी २४ जुलै २०१९ ला गर्ग यांनी केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या सचिवपदावर बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अर्ध्या तासातच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला होता.

आरबीआयच्या अतिरिक्त निधीवरून उर्जित पटेलांनीही दिला होता राजीनामा-

दरम्यान, आरबीआयचे अतिरिक्त पैसे हस्तांतरित करण्यावरून तत्कालीन आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि केंद्र सरकारचे संबंध ताणले होते. अखेर सरकारच्या दबावानंतर उर्जित पटेल यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.