ETV Bharat / business

मुकेश अंबांनींच्या संपत्तीत वर्षभरात सुमारे १ लाख १२ हजार कोटींची वाढ - अंबानी संपत्ती

पेट्रोलियम उत्पादन ते दूरसंचार कंपनी असे विविध उद्योग असलेले अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत असलेले १२ वे व्यक्ती आहेत. रिलायन्सचे सातत्याने वधारणाऱ्या शेअरमुळे अंबानींच्या सपंत्तीत अधिक वाढ झाली आहे.

Mukesh Ambani
मुकेश अंबानी
author img

By

Published : Dec 25, 2019, 12:20 PM IST

नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वर्ष २०१९ मध्ये १६.५ अब्ज डॉलरची (१.१२ लाख कोटी) वाढ झाली आहे. त्यामुळे अंबानी यांची संपत्ती एकूण ६०.८ अब्ज डॉलर झाल्याचे ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्समध्ये म्हटले आहे.

पेट्रोलियम उत्पादन ते दूरसंचार कंपनी असे विविध उद्योग असलेले अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत असलेले १२ वे व्यक्ती आहेत. रिलायन्सचे सातत्याने वधारणाऱ्या शेअरमुळे अंबानींच्या सपंत्तीत अधिक वाढ झाली आहे. वर्षभरात रिलायन्सचे शेअर हे ४१ टक्क्यांनी वधारल्याचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीतून दिसून आले.

हेही वाचा-जिओचा असा आहे नवा प्लॅन, ३९ टक्के वाढल्या किंमती

गेल्या काही वर्षात कंपनीने वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय सुरू केले आहेत. यामध्ये जिओ, ब्रॉडबँड सेवा देणारी जिओ गिगाफायबर या कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीने किरकोळ विक्रीतील व्यवसाय अधिक बळकट केला आहे. कंपनी लवकरच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रात उतरणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठी भांडवल मूल्य असलेली कंपनी

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील पहिली १० लाख कोटी रुपयांचे भांडवली मूल्य असलेली कंपनी झाली आहे.रिलायन्सने मार्च २०२० पर्यंत कर्जमुक्त होण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. यापूर्वीच रिलायन्सने तेलशुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल उद्योगातील २० टक्के हिस्सा सौदी अॅरेम्को कंपनीला विकण्याचे जाहीर केले आहे. रिलायन्सने जीओ प्लॅटफॉर्म्स लि. या डिजिटल माध्यमांची स्थापना करण्याचे नुकतेच जाहीर केले. या नव्या कंपनीत रिलायन्स १.०८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

हेही वाचा-'रिलायन्स'चे भांडवली मूल्य पोहोचले १० लाख कोटींवर!

जगात सर्वात श्रीमंत मायक्रोसॉफ्ट्सचे संस्थापक बिल गेट्स आहेत. त्यांची संपत्ती ही ११३ अब्ज डॉलर आहे.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.