नवी दिल्ली - भारतीय रेल्वे सार्वजनिक-खासगी भागीदारीमार्फत(PPP) किसान रेल्वेचा प्रकल्प राबवणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली.
निर्मला सितारामन यांनी मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
यावेळी पर्यटन वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेमार्फत तेजस सारख्या गाड्या वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबई - अहमदाबाद दरम्यान जलदगती एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवणार असल्याचे त्या म्हणाल्या.
रेल्वे बजेटमध्ये महत्त्वाच्या तरतूदी
- मुंबई व अहमदाबाद दरम्यान अधिक वेगवान गाड्यांसाठी प्रयत्नशील
- आगामी काळात सरकार नवीन 11 हजार रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार
- केंद्रीय रेल्वे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून किसान रेल्वेची सुरुवात
- 1150 रेल्वे सार्वजनिक-खासगी भागीदारीवर चालणार; तसेच चार रेल्वे स्थानकांचा खासगी क्षेत्राद्वारे पूनर्विकास होणार
- तेजस सारख्या रेल्वे उपक्रमांची संख्या वाढवणार; याद्वारे पर्यटन स्थळांना जोडणार
- रेल्वे स्थानकांमधील मोकळ्या जागांमध्ये सोलर पॅनल बसवण्याची योजना विचाराधीन
- तेजस रेल्वे सारखे आणखी प्रकल्प राबवण्यासाठी 27 हजार किमीच्या नवीन रेल्वे रूळांचे विद्युतीकरण होणार