ETV Bharat / business

भारत-नेपाळ दरम्यानच्या पेट्रोलिअम पाईपलाईनचे उद्घाटन; देशाची ३.५ अब्ज रुपयांची गुंतवणूक

मोतिहारी-अमलेखगंज ही पेट्रोलिअम पाईपलाईन ६० किलोमीटरची आहे. दक्षिण आशियात दोन देशांमधील ही  पहिलीच पेट्रोलिअम पाईपलाईन आहे. भारत नेपाळला टँकरद्वारे १९७३ पासून पेट्रोलिअम उत्पादनाचा पुरवठा करत आहे.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 10, 2019, 2:23 PM IST

नवी दिल्ली - नेपाळचे भारताबरोबर संबंध अधिक दृढ करणाऱ्या प्रकल्पाची आज सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी संयुक्तरीत्या मोतिहारी-अमलेखगंज पेट्रोलिअम पाईपलाईनचे व्हिडिओ लिंकद्वारे उद्घाटन केले.

मोतिहारी-अमलेखगंज ही पेट्रोलिअम पाईपलाईन ६० किलोमीटरची आहे. दक्षिण आशियात दोन देशामधील ही पहिलीच पेट्रोलिअम पाईपलाईन आहे. भारत नेपाळला टँकरद्वारे १९७३ पासून पेट्रोलिअम उत्पादनाचा पुरवठा करत आहे.

हेही वाचा-भारताला निर्यातीचे केंद्र करा; नीती आयोगाची चिनी उद्योजकांना विनंती

भारत-नेपाळमधील उर्जा क्षेत्रातील भागीदारीचा प्रकल्प हे जवळच्या द्विपक्षीय संबंधाचे प्रतिक असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. यामधून प्रदेशामधील उर्जेची सुरक्षितता वाढणार आहे. त्यातून वाहतुकीचा खर्चही कमी होणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. या योजनेसाठी पहिला प्रस्ताव १९९६ मध्ये करण्यात आला होता. भारताने प्रकल्पासाठी ३.५ अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा-ज्वेलरी उद्योगाला मंदीची मोठी झळ, हजोरा कुशल कारागिरांचे रोजगार संकटात

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.