ETV Bharat / business

मारुतीचे हरियाणाच्या प्रकल्पामधील २ दोन दिवस उत्पादन राहणार बंद - मंदी

मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ३३ टक्के  घट झाली आहे.

प्रतिकात्मक - मारुती सुझुकी
author img

By

Published : Sep 4, 2019, 3:46 PM IST

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकी मंदीमधून जात आहे. कंपनीने गुरुग्राम आणि मनेसर प्रकल्पामधील उत्पादन दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मारुतीकडून ७ आणि ९ सप्टेंबरला उत्पादन प्रकल्पातील काम बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी कोणतेही उत्पादन घेतले जाणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. सलग सात महिने कंपनीने उत्पादन घटविले आहे. मारुतीने ऑगस्टमध्ये ३३.९९ टक्के उत्पादन घटविले आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये १ लाख ११ हजार ३७० वाहनांचे उत्पादन घेतले.

हेही वाचा-डॉलरपुढे रुपयाची घसरगुंडी; गेल्या ९ महिन्यातील गाठला तळ

गतवर्षी कंपनीने ऑगस्टमध्ये १ लाख ६८ हजार ७२५ वाहनांचे उत्पादन घेतले होते. जुलैमध्ये प्रवासी वाहनांचे १ लाख १० हजार २१४ वाहनांचे उत्पादन घेतले होते. तर गतवर्षी १ लाख ६६ हजार १६१ वाहनांचे उत्पादन घेण्यात आले होते. प्रवासी वाहनांच्या विक्रीत २५.१५ टक्के घट झाली आहे.

हेही वाचा-५ टक्के.... तुम्हाला माहीत नाही का, ५ टक्के म्हणजे काय? - पी. चिदंबरम

मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ३३ टक्के घट झाली आहे.

हेही वाचा-स्थावर मालमत्ता क्षेत्राला लवकरच मिळणार आर्थिक सुधारणांचा 'टेकू'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.