ETV Bharat / business

दिवाळीमध्येच सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ; 'हे' आहेत आजपासून नवीन नियम - gas cylinder booking new rule

काही नियम आजपासून बदलणार आहेत. या सर्व नियमांचा सामान्यांच्या बजेटवर परिणाम होणार आहे. गॅस सिलिंडर बुक करणे व डिलिव्हरी करण्याची पद्धत बदलणार आहे.

आर्थिक नियम
आर्थिक नियम
author img

By

Published : Nov 1, 2021, 3:21 PM IST

Updated : Nov 1, 2021, 3:27 PM IST

हैदराबाद - दिवाळीमध्ये महागाईमुळे सामान्यांना मोठी आर्थिक झळ बसत आहे. आजपासून (1 नोव्हेंबर) काही नियम बदलले आहेत. त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. आजपासून बँकांमध्ये पैसे जमा करणे व काढण्यासाठी ग्राहकांना शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच गॅस सिलिंडर बुकिंगचे नियमही बदलणार आहेत. तर काही रेल्वेच्या वेळाही बदलणार आहे. या सर्व नियमांचा सामान्यांच्या बजेटवर परिणाम होणार आहे.

दर महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीच्या आढावा घेण्यात येतो. त्याप्रमाणे 1 तारखेला एलपीजी कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे दर बदलण्यात येतात. गेल्या महिन्यात पेट्रोल व डिझेलचे दर प्रति लिटर 8 रुपयांनी वाढले होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतरही एलपीजीचे दर वाढतात. त्यामुळे गॅस सिलिंडरचे दरही वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-Paytm आणणार 16,600 कोटींचा IPO, गुंतवणूकदारांसाठी यंदाच्या दिवाळीमध्ये मोठी संधी

गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी नवीन नियम-

गॅस सिलिंडर बुक करणे व डिलिव्हरी करण्याची पद्धत बदलणार आहे. नव्या नियमानुसार ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी पाठविण्यात येणार आहे. ओटीपीशिवाय ग्राहकांना गॅस सिलिंडर देण्यात येणार नाही. घरात गॅस सिलिंडर पोहोचल्यानंतर डिलिव्हरी बॉयला ओटीपी सांगितल्यानंतरच ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरसाठी चुकीची मोबाईल क्रमांक देणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गॅस सिलिंडर कंपन्यांनी सर्व ग्राहकांना नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा-महागाईचे संकट: एलपीजीसह पेट्रोल-डिझेलचे दर पुढील आठवड्यात वाढण्याची शक्यता

बँकिंग व्यवहाराचे वाढणार शुल्क

बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी व पैसे काढण्यासाठी ग्राहकांना शुल्क द्यावे लागणार आहे. या नियमाची बँक ऑफ बडोदाने सुरुवात केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या नियमानुसार 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना 150 रुपये द्यावे लागणार आहे. ग्राहकांना केवळ तीन वेळा पैसे जमा करणे मोफत असणार आहे. तर एका महिन्यांत तीनहून अदिवेळा जादा पैसे भरले तर 40 रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामधून जनधन योजनेतील खातेदारांना सवलत देण्यात आलेली आहे. त्यांना तीनहून अधिक वेळा पैसे जमा केल्यास कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र, पैसे काढताना 100 रुपये द्यावे लागणार आहेत.

हेही वाचा-खूशखबर! ईपीएफवर वार्षिक व्याज 8.5 टक्के मिळणार; केंद्र सरकारकडून मंजुरी

काही मोबाईलवर बंद होणार व्हॉट्सअप

काही आयफोन आणि अँड्राई फोनवर व्हॉट्सअपची सेवा सुरू राहणार नाही. व्हॉट्सअपच्या माहितीनुसार 1 नोव्हेंबरपासून अँड्राईड 4.0.3 आईसक्रीम सँडविच, आयओएस 9, और KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही.

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल-

देशभरातील रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. हा बदल 1 ऑक्टोबरपासून होणार होता. मात्र, 1 नोव्हेंबरपासून होणार आहे. देशात 13 हजार पॅसेंजर रेल्वे आणि 7 हजार मालगाडीचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. देशातील 30 राजधानी रेल्वेच्याही वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.

Last Updated : Nov 1, 2021, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.