ETV Bharat / business

कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणात स्टार्टअपसह एसएमई पडले बंद -सर्वेक्षण - एमएसएमई

लोकलसर्व्हेचे संस्थापक सचिन तापरिया म्हणाले, की स्टार्टअप आणि एमएसएमई हे स्पर्धेत विशेषत: कोरोना महामारीत तग धरून राहण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना महामारी
कोरोना महामारी
author img

By

Published : May 27, 2021, 10:58 PM IST

नवी दिल्ली - काही राज्यांत टाळेबंदी लागू केल्याने स्टार्टअप आणि एसएमई क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये संपूर्ण उद्योग बंद करणे किंवा कर्मचाऱ्यांची कपात झाल्याचे सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे.

लोकलसर्व्हे या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मने 6 हजार एसएमई आणि स्टार्टअपचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये किती प्रमाणात उद्योगांत घसरण झाली, किती विक्री झाली आणि किती उद्योग पूर्णपणे बंद पडले याची माहिती देण्यात आलेली आहे. या सर्वेक्षणात 171 जिल्ह्यातील 6,000 एसएमई सहभागी झाले होते. यामधील 41 टक्के एसएमई उद्योगांनी 1 महिना कामकाज सुरू होण्यासाठी निधी असल्याचे सांगितले. तर 22 टक्के एसएमई उद्योगांनी 3 महिना कामकाज सुरू होण्यासाठी निधी असल्याचे सांगितले. भारतामधील लघू व्यवसाय हे लघू आणि मध्यम उद्योग (एसएमई) म्हणून ओळखले जातात. कोरोना महामारीचा गतवर्षी मार्चपासून संसर्ग सुरू झाल्याने स्टार्टअप हे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

हेही वाचा-राज्यात 111 लाख टन साखर शिल्लक राहणार; कारखाने आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता

चौथ्या तिमाहीत आर्थिक विकासदर हा 1 टक्क्यांहून अधिक होण्याची अपेक्षा

लोकलसर्व्हेचे संस्थापक सचिन तापरिया म्हणाले, की स्टार्टअप आणि एमएसएमई हे स्पर्धेत विशेषत: कोरोना महामारीत तग धरून राहण्याचा प्रयत्न करत आहे. मागील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सणासुदीत अर्थव्यवस्था सावरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आर्थिक विकासदर हा 1 टक्क्यांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा-पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून नितीन राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

कर्मचाऱ्यांवर मिळणाऱ्या लाभांवर पहिला परिणाम-

49 टक्के स्टार्टअप व एमएसएमईने कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे भत्ते व लाभांमध्ये जुलैपासून कपात करण्याचे नियोजन केल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

निराशादायक भविष्य-

केवळ 22 टक्के स्टार्टअप्स आणि एमएसएमईने येत्या सहा महिन्यात वृद्धीदर होण्याची आशा आहे. तर 59 टक्के उद्योगांनी त्यांचा उद्योग कमी किंवा बंद होण्याची भीती व्यक्त केली आहे.

सरकारकडून मदतीची अपेक्षा -

बहुतांश एसएमई आणि स्टार्टअपला केंद्राकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.