ETV Bharat / business

कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर - निर्मला सीतारामन पत्रकार परिषद लाईव्ह

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन
author img

By

Published : May 15, 2020, 4:00 PM IST

Updated : May 15, 2020, 5:21 PM IST

16:58 May 15

शेतकऱ्यांना शेतमालाला निश्चित भाव देण्यासाठी कायदा-

 शेतकऱ्यांना शेतमालाला निश्चित भाव व त्यांची कमी जोखीम करणे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यांचे शोषण होवू नये, यासाठी कायदा करण्यात आहे. यामधून त्यांचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास अनुराग ठाकूर व निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. 

16:54 May 15

शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य!

 शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करण्यासाठी आंतरराज्यीय बंधने राहणार नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने हे बंधन काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार असल्याचे केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. 

16:51 May 15

जीवनावश्यक कायद्यातील बदलाची महत्त्वपूर्ण प्रशासकीय सुधारणा!

जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. मात्र, त्यामध्ये कायद्यामुळे निर्यात करता येत नाही.  जीवनावश्यक वस्तुंचा समावेश असूनही कांदे, डाळी, तेलबिया यांच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. साठवणुकीवरही निर्बंध राहणार नाहीत.  कृषी क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढून शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

16:43 May 15

मधुमक्षिका पालनासाठी ५०० कोटींची योजना

16:42 May 15

दुग्ध उत्पादन क्षेत्रासाठी १५ हजार कोटींची मदत

दुग्ध उत्पादन क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे.  

16:42 May 15

औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची मदत

देशातील औषधी वनस्पतींना जगभरात मागणी आहे. यामध्ये १० लाख हेक्टर क्षेत्ल लागवडीखाली आणण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी ५ हजार कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. गंगेजवळील ८०० हेक्टर क्षेत्र हे औषधी आणि सौंदर्यप्रसाधनांच्या वनस्पतीसाठी लागवडीखाली आणण्यात येणार आहे.  

16:36 May 15

पीएम मत्स्य संपदा योजनेतून मत्स्य उद्योगासाठी २० हजार कोटींची मदत

16:36 May 15

देशातील पशुधन महत्त्वाचे आहे. जनावरांचे तोंडाचे रोग आणि पायाचे रोग होवू नये, यासाठी १०० टक्के लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे ५३ कोटी पशुंचा समावेश असेल. त्यासाठी १३ हजार ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे. 

16:33 May 15

 स्थानिक उद्योग जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी क्लस्टरप्रमाणे मदत

२ लाख उद्योगांना होणार फायदा

एससी, एसटी, महत्त्वाकांक्षी क्षेत्र व महिलांवर लक्ष केंद्रित

16:27 May 15

खाद्यपदार्थाच्या लघू उद्योगांना १० हजार कोटींची मदत

16:20 May 15

देशातील २ कोटी शेतकऱ्यांना व्याजावर अनुदान

  भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक, डाळ उत्पादक देश आहे. तर साखर, कापूस, शेंगदाणे, फळे, पालेभाज्या आणि मत्सोद्योगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कडधान्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक उत्पादन घेतल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

16:17 May 15

पंतप्रधान किसान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ हजार ७०० कोटी जमा

पंतप्रधान विमा योजनेंतर्गत ६, ४०० कोटींचे वाटप

16:15 May 15

गेल्या २ महिन्यांत शेतकऱ्यांसाठी उपाययोजना केल्या आहेत.  

लॉकडाऊनच्या काळात ७४ हजार कोटींची धान्य खरेदी

16:10 May 15

निर्मला सीतारामन यांनी ११ महत्त्वपूर्ण सुधारणांची घोषणा करणार असल्याचे सांगितले. 

16:06 May 15

 कृषी आणि कृषीपुरक उद्योगांसाठी घोषणा करणार

16:02 May 15

शेतकरी कठीण परिस्थितीत धान्याचा पुरवठा करत आहेत.

15:40 May 15

कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा थोड्याच वेळात करणार आहेत.

नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचा भाग म्हणून सीतारामन आज पत्रकार परिषद घेत आहेत. ही त्यांची तिसरी पत्रकार परिषद आहे. 

कोरोनाच्या संकटकाळात सर्वच क्षेत्र आणि समाजातील घटकांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. टाळेबंदीने गाळात रुतणारी अर्थव्यवस्था आणि संकटात असलेल्या घटकांसाठी सीतारामन काय घोषणा करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Last Updated : May 15, 2020, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.