बंगळुरू - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पानंतरच्या पत्रकार परिषदेत नव्या प्राप्तिकराच्या रचनेचे स्पष्टीकरण दिले आहेत. प्राप्तिकरांच्या नव्या रचनेत जुन्या प्राप्तिकराच्या रचनेप्रमाणे ११ वजावटी (एक्झम्पेशन) मिळणार आहेत.
ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने नव्या प्राप्तिकर रचनेत वजावटी मिळणार का, असा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उपस्थित केला. त्यावर त्यांनी प्राप्तिकराच्या नव्या रचनेचे स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, नव्या प्राप्तिकर रचनेत देण्यात येणाऱ्या ११ वजावटींची यादी दिलेली आहे. त्याबाबतची अधिसूचनाही काढलेली आहे.
अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर त्यामधील तरतुदी आणि घोषणांबाबत माहिती देण्यासाठी निर्मला सीतारामन या विविध शहरांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान त्या उद्योजक, व्यापारी, माध्यम प्रतिनिधी, करसल्लागार यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत.
हेही वाचा-रेल्वे स्टेशनवरील गुगलची मोफत वायफायची सेवा होणार बंद, कारण....
अशी नवीन कररचना-
केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये करदात्यांना प्राप्तीकर आकारणीसाठी नवीन किंवा जुनी कर रचना निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. नव्या कररचनेत ५ लाखांपासून ७.५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना २० टक्क्यांऐवजी १० टक्के कर द्यावा लागणार आहे.
हेही वाचा-साखर कारखान्यांसाठी 'सुगीचा हंगाम', चढे दर असताना निर्यातीची संधी