ETV Bharat / business

Adhar Pan Card Link : 31 मार्चच्या आधी आधार पॅन कार्डला लिंक करा

author img

By

Published : Mar 17, 2022, 1:10 PM IST

तुम्ही मोबाईलवरूनही आधार लिंक करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून UIDPAN < 12 अंकी Aadhar Number> < 10 अंकी Pan Number> टाइप करून 567678 या 561561 पर SMS करा. यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात आधारशी पॅन जोडल्याचा मेसेज येईल.

Adhar Pan Card Link
Adhar Pan Card Link

नवी दिल्ली : आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. या तारखेपर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास, तुमचा पॅन सक्रिय होणार नाही. यामुळे बँक खाते उघडणे, आयकर परतावा, शेअर्समध्ये गुंतवणूक करणे, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे यासारखे आर्थिक व्यवहार तुम्ही करू शकणार नाहीत.

कसे लिंक कराल आधार कार्ड

आधार कार्ड ही युनिक ओळख आहे. या मदतीने भारतीयाला मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. भारतीय नागरिकाची ओळख आणि त्याची बायोमेट्रिक माहितीही आधार कार्डमध्ये समाविष्ट आहे. तुम्ही बायोमेट्रिक आधार पडताळणीद्वारे किंवा NSDL आणि UTITSL च्या पॅन सेवा केंद्रांना भेट देऊन लिंक करू शकता.

मोबाईलवरूनही करू शकता आधार लिंक

तुम्ही मोबाईलवरूनही आधार लिंक करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून UIDPAN < 12 अंकी Aadhar Number> < 10 अंकी Pan Number> टाइप करून 567678 या 561561 पर SMS करा. यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात आधारशी पॅन जोडल्याचा मेसेज येईल.

इंन्कम टॅक्स च्या वेबबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल की नाही हे पाहू शकता. यासाठी सर्व प्रथम www.incometaxgov.in वर लॉगईन करा. यानंतर Our Service वर क्लिक करा. तेथे Link Aadhaar हा पर्याय दिसेल. नंतर Link Aadhaar Know About Aadhaar Pan Linking Status वर क्लिक करा. जेव्हा तुमच्यासमोर पेज ओपन होईल. तेथे PAN आणि Aadhaar Card चे तपशील भरा. नंतर 'View Link Aadhaar Status' वर क्लिक करा.

डीमॅट खात्यात नॉमिनीचे नाव टाका

डिमॅट खाते हे तुमच्या शेअर सर्टिफिकेट्स आणि इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटीजसाठी बँक खात्यासारखे असते. यातूनच तुम्ही शेअर बाजारातील व्यवहार करता. इतर सर्व बँक खात्यांप्रमाणेच, नामनिर्देशित व्यक्तीचा उल्लेख डीमॅट खात्यातही असणे आवश्यक आहे. 31 मार्चपर्यंत तसे न केल्यास डिमॅट खातेही बंद केले जाईल.

हेही वाचा - GST Rate : विमान वाहतूक क्षेत्रातील दुरुस्ती आणि देखभाल सेवांच्या जीएसटी दरात मोठी घट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.