ETV Bharat / business

चिनी उत्पादनांनी भारतीय बाजारपेठेवर 'असा' मिळवला ताबा - Pharma Industry import API from China

मध्यमवर्गीयांच्या हातामधील मोबाईल ते घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा बहुतेक उत्पादनांत चिनी कंपन्यांनी भारतात मोठी बाजारपेठ मिळविली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 3, 2020, 4:00 PM IST

नवी दिल्ली – गलवानच्या खोऱ्यात भारत आणि चीनच्या हिंसक झटापटीत 20 जवानांना वीरमरण आले. त्यानंतर देशभरात चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. प्रत्यक्षात देशातील ग्राहक आणि अनेक उद्योग हे चिनी उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.

मध्यमवर्गीयांच्या हातामधील मोबाईल ते घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा बहुतेक उत्पादनांत चिनी कंपन्यांनी भारतात मोठी बाजारपेठ मिळविली आहे.

स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेत चिनी कंपन्यांचे वर्चस्व

दूरसंचार क्षेत्रातील उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे सुट्टे भाग आणि खेळणी यांची देशात मोठ्या प्रमाणात विक्री होते. चिनी माध्यमांच्या मते चिनी उत्पादने ही भारतीय बाजारपेठेला आव्हान देत आहेत. शाओमीच्या स्मार्टफोनची खरेदी भारतीय मध्यमवर्गीयांकडून होते. त्यांच्याकडे कदाचित आयफोन खरेदी करण्याकडे पैसे नसतात, असे चिनी माध्यमाने एका वृत्तात म्हटले होते.

विविध उद्योग सुट्ट्या भागांसाठी चीनवर अवलंबून

स्मार्ट फोन, सौर उर्जा साधने आणि वाहनांचे सुट्टे भाग यासाठीही भारत चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. स्थानिक बाजारपेठेत चिनी सौर उर्जा उत्पादनांचा 90 टक्के हिस्सा आहे. तर दूरसंचार उत्पादनात चिनी उत्पादनांचा 25 टक्के हिस्सा आहे. चीनने 4.3 अब्ज डॉलरचे किमतीचे विविध सुट्टे भाग आर्थिक वर्ष 2018 मध्ये निर्यात केले आहेत. तर 57 अब्ज डॉलर किमतीचे वाहनांचे सुट्टे भाग आर्थिक वर्ष 2018 मध्ये निर्यात केले आहेत.

भारतीय औषधी उद्योगांकडूनही चीनमधून कच्च्या मालाची खरेदी

औषधांच्या उत्पादनासाठी कच्चा माल असलेल्या क्रियाशील औषधी घटकद्रव्यांची (एपीआय) गरज भासते. त्यासाठी देशातील औषधी उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात चीनमधून एपीआयची आयात करण्यात येते. देशात एपीआयचे उत्पादन वाढिण्यासाठी सरकार उत्पादनाशी संलग्न सवलतीची योजना (पीएलआय) जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यासाठी येत्या आठ वर्षात सरकारला 6 हजार 940 दशलक्ष कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

भारतीय औषधी उद्योगांकडून गरजेच्या एकूण 68 टक्के कच्चा माल हा चीनमधून आयात करण्यात येतो. भारतीय स्टार्टअपमध्ये 75हून अधिक चिनी कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. यामध्ये ई-कॉमर्सह फिनटेक, समाज माध्यम आणि लॉजिस्टक क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश असल्याचे गेटवे हाऊस या थिंक टँकने म्हटले आहे.

स्टार्टअपमध्ये चिनी कंपन्यांची मोठी गुंतवणूक

देशातील 30 युनिकॉर्न स्टार्ट अपमध्ये चिनी गुंतवणूकदारांनी 1 अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे. यामध्ये अलिबाबा, बाईटडान्स आणि टेन्सेंटने सर्वाधिक 92हून अधिक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. चिनी कंपन्यांनी पेटीएम, बायजुस, ओयो आणि ओलामध्ये गुंतवणूक केली आहे. स्टार्टअपमध्येही चिनी कंपन्यांची गुंतवणूक

पेटीएम ही डिजीटल देयक क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. अलिबाबाची मालकी असलेल्या अँट फायनान्शियलने पेटीएममध्ये 29.71 टक्के हिस्सा घेतला आहे. त्यामुळे पेटीएममध्ये अलिबाबाचा सर्वाधिक हिस्सा आहे. टिकटॉक या व्हिडिओ अपला भारतीयांनी युट्यूबनंतर सर्वाधिक पसंती दिली होती. बाईटडान्सची मालकी असलेल्या टिकटॉकचे 200 दशलक्षहून अधिक वापरकर्ते होते. या कंपनीवर केंद्र सरकारने बंदी लागू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.