ETV Bharat / business

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या व्यापार बातम्यांचा आढावा

author img

By

Published : Dec 27, 2019, 7:38 PM IST

वित्तीय आणि राजकीय भ्रष्टाचार, गुन्हे आणि हिंसा, गरीबी आणि सामाजिक विषमता आणि हवामान बदल याबाबतही भारतीयांना चिंता वाटत असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे.

Business news in brief
व्यापार बातम्या आढावा

नवी दिल्ली - शहरी भागातील भारतीयांना सर्वात अधिक कोणती चिंता वाटते, पीएमसीने जप्त केलेल्या मालमत्तेचे काय होणार यासारख्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा जाणून घ्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सरकारी बँकांच्या प्रमुखांच्या भेटी घेणार आहेत. अशा विविध व्यापार बातम्यांचा आजच्या आढाव्यात समावेश आहे.

  • शहरी नागरिकांना बेरोजगारीची सर्वाधिक चिंता

नवी दिल्ली - शहरी भागात राहणाऱ्या भारतीयांना सर्वाधिक म्हणजे बेरोजगारीची चिंता वाटते. तर देशातील ६९ टक्के लोकांना देश योग्य दिशेने जात असल्याचे वाटते. ही माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. वित्तीय आणि राजकीय भ्रष्टाचार, गुन्हे आणि हिंसा, गरीबी आणि सामाजिक विषमता आणि हवामान बदल याबाबतही भारतीयांना चिंता वाटत असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे. हा सर्व्हे इप्सॉस या संशोधन संस्थेने केला.

  • पामतेलावरील आयात शुल्कात कपात करू नये, एसईएची सरकारला विनंती

नवी दिल्ली - सरकारने पामतेलावरील आयात शुल्कात कपात करू नये, अशी विनंती खाद्यतेल उद्योगाची संस्था असलेल्या एसईएने केली आहे. आयात शुल्क ४० टक्क्यांवरून ३० टक्के केल्यास देशातील तेलउत्पादकांवर परिणाम होईल, अशी संघटनेने भीती व्यक्त केली आहे.

  • आयात करूनही कांद्याच्या किमती आटोक्याबाहेर

नवी दिल्ली - किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलो १५० रुपये आहेत. कांद्याची आयात करूनही किमती उतरलेल्या नाहीत. मुंबईत कांदा प्रति किलो ८० रुपयाने दर दिल्लीत १०२ रुपयाने विकण्यात आला आहे.

  • केंद्रीय अर्थमंत्री सरकारी बँक प्रमुखांची भेट घेणार

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सरकारी बँकांच्या प्रमुखांच्या भेटी घेणार आहेत. या भेटीदरम्यान नुकताच जाहीर केलेल्या सुधारणा आणि अर्थव्यवस्थेमधील समस्यांवर चर्चा होणार आहे.

हेही वाचा-रेल्वे प्रवासाच्या तिकिटांचे दर वाढणार; व्ही. व्ही. यादव यांचे संकेत

  • जप्त केलेल्या मालमत्तेचे पीएमसी प्रशासक करणार मूल्यांकन

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने घोटाळ्यामुळे संकटात सापडलेल्या पंजाब महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या प्रशासकाने एचडीआयएल ग्रुपच्या मालकीच्या दोन विमान आणि यांत्रिकी बोटीचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मूल्यांकन करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव पीएमसीच्या प्रशासकांनी तयार केला आहे.

  • हवाई क्षेत्रात १०० टक्के एफडीआय; केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्ली-केंद्र सरकारकडून केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ १ फेब्रुवारीला सादर केला जाण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हवाई क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या हवाई क्षेत्रात केवळ ४९ टक्के एफडीआय करण्याची परवानगी आहे. या निर्णयानंतर एअर इंडियाची खरेदी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार स्वारस्य दाखविण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-पीएमसी घोटाळा; मुंबई पोलिसांकडून न्यायालयात स्वतंत्र आरोपपत्र दाखल

  • एअर इंडियाचे कर्मचारी जाणार संपावर

मुंबई- एअर इंडियासह स्वत:चे भविष्य अनिश्चित असल्याने सरकारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय कंपनी लवाद प्राधिकरणात (एनसीएलएटी) जाण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे एअर इंडियाकडे थकित वेतन आहे. त्यामुळे कर्मचारी एनसीएलटीमध्ये जाणे अथवा संपावर जाणे या दोन्ही पर्यायापैकी एका पर्यायाचा अवलंब करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-मागोवा २०१९ - अन्नाच्या बाजारपेठेत महागाईचा कळस

  • पीएम वय वंदन योजनेतील लाभार्थ्यांना आधार कार्ड बंधनकारक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने प्रधानमंत्री वय वंदन योजना (पीएमव्हीव्हीवाय) या निवृत्तीवेतन योजनेसाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.