ETV Bharat / business

आनंदवार्ता ! इन्फोसिस १८ हजार विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीमधून देणार नोकऱ्या

चालू तिमाहीदरम्यान इन्फोसिसने ८ हजार जणांना सेवेत घेतले आहे. त्यामध्ये २ हजार ५०० हे पदवी घेवून बाहेर पडलेले (फ्रेशर) आहेत.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 13, 2019, 2:05 PM IST

बंगळुरू - माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे नोकऱ्या देण्यासाठी देशात आघाडीवरच राहिले आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा देशातील दुसऱ्या क्रमांकाची असलेली आयटी कंपनी इन्फोसिसने दाखवून दिली आहे. इन्फोसिसने १८ हजार जणांना नोकऱ्या देणार असल्याचे जाहीर केले आहे. या सर्व नोकऱ्या चालू वर्षात दिल्या जाणार आहेत.

सध्या इन्फोसिसमध्ये २.२९ लाख कर्मचारी आहेत. कंपनी जरी कठीण परिस्थितीमधून जात असली तरी त्याचा ग्राहकसेवेवर कोणातही परिणाम झाला नसल्याचे इन्फोसिसने म्हटले आहे. चालू तिमाहीदरम्यान इन्फोसिसने ८ हजार जणांना सेवेत घेतले आहे. त्यामध्ये २ हजार ५०० हे पदवी घेवून बाहेर पडलेले (फ्रेशर) आहेत. चालू वर्षात आम्ही १८ हजार विद्यार्थ्यांना विद्यापीठातून घेणार असल्याचे इन्फोसिसचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर यू.बी. प्रवीण राव यांनी सांगितले. इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी करियरअच्या संधीसह इतर अनेक उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.