नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेत महागाईचा दर घसरून जानेवारीत ४.६ टक्के झाला आहे. पालेभाज्यांचे दर घसरल्याने महागाईचे प्रमाण कमी झाल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
डिसेंबर २०२० मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचे प्रमाण हे ४.५९ टक्के होते. हे महागाईचे प्रमाण कमी होऊन जानेवारीत ४.६ टक्के झाले आहे. अन्नधान्याच्या वर्गवारीत जानेवारीत महागाईचे प्रमाण हे १.८९ टक्के राहिले आहे. हे महागाईचे प्रमाण डिसेंबरच्या तुलनेत कमी आहे. डिसेंबरमध्ये अन्नधान्याच्या वर्गवारीत जानेवारीत महागाईचे प्रमाण हे ३.४१ टक्के राहिले आहे. ही माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केली आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पावर विरोधकांकडून चुकीचे कथन - केंद्रीय अर्थमंत्र्यांची राज्यसभेत टीका
पतधोरण निश्चित करताना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ बाजारपेठेतील महागाईचा विचार करण्यात येतो. किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण जास्तीत जास्त ४ टक्के तर कमीत कमी २ टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट आरबीआयने निश्चित केले आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ६६१ रुपयांची घसरण
कोरोनाच्या काळात महागाईने गाठला होता उच्चांक-
कोरोनाच्या संकटात भाजीपाला आणि अंड्यांचे दर ऑक्टोबर २०२० मध्ये कमालीचे वाढले होते. या दरवाढीनंतर किरकोळ बाजारपेठेत महागाईने ऑक्टोबरमध्ये गेल्या सहा वर्षातील उच्चांक गाठला आहे. किरकोळ बाजारपेठेत ऑक्टोबरमध्ये महागाईचे प्रमाण हे ७.६१ टक्के राहिले आहे. हे महागाईचे प्रमाण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित मर्यादेहून अधिक होते.