नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरात मोठी घसरण होत असताना आर्थिक आघाडीवर दिलासादायक बातमी आहे. देशातील औद्योगिक उत्पादन ऑक्टोबरमध्ये ३.६ टक्क्यांनी वाढले आहे.
उत्पादन क्षेत्र आणि वीजनिर्मिती क्षेत्राची चांगली कामगिरी या कारणांनी ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादन वाढले आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) आकडेवारीनुसार उत्पादन क्षेत्राने ऑक्टोबरमध्ये वृद्धीदर ३.५ टक्के नोंदविला आहे. तर वीजनिर्मिती क्षेत्राने ११.२ टक्के वृद्धीदर नोंदविला आहे. असे असले तरी खाणकाम क्षेत्रातील उत्पादनात १.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ६.६ टक्क्यांनी घसरला होता.
हेही वाचा-सलग सहाव्यांदा ऑगस्टमध्ये मुख्य औद्योगिक क्षेत्रांच्या उत्पादनात घसरण
ऑगस्टमध्ये सलग सहाव्या महिन्यात औद्योगिक क्षेत्राच्या उत्पादन घसरण-
सलग सहाव्या महिन्यात आठ मुख्य पायाभूत औद्योगिक क्षेत्रात उत्पादनात घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये आठ मुख्य पायाभूत क्षेत्राच्या उत्पादनात ८.५ टक्के घसरण झाली आहे. स्टील, तेलशुद्धीकरणाची उत्पादने आणि सिमेंटच्या उत्पादनात घसरण झाल्याने पायाभूत क्षेत्राच्या उत्पादनात घसरण झाली आहे.
हेही वाचा-सलग सहाव्यांदा ऑगस्टमध्ये मुख्य औद्योगिक क्षेत्रांच्या उत्पादनात घसरण
दरम्यान, कोरोना महामारी आणि टाळेबंदी देशाच्या औद्योगिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.