नवी दिल्ली - औद्योगिक उत्पादनात दोन महिन्यानंतर वृद्धी झाली आहे. मार्चमध्ये २२.४ टक्के औद्योगिक उत्पादनात वृद्धी झाली आहे. उत्पादन, खाण आणि उर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादनात वाढ झाली आहे.
उत्पादन क्षेत्राचा औद्योगिक उत्पादन क्षेत्रात ७७.६३ टक्के हिस्सा आहे. हा औद्योगिक उत्पादन निर्देशांक मार्च २०२१ मध्ये २५.८ टक्क्यांनी वाढल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीतून समोर आले आहे.
हेही वाचा-नैनितालमधील आकर्षक आणि मजबूत भूकंपरोधक नैसर्गिक घरे!
या क्षेत्रांचे वाढले उत्पादन-
- खाण उद्योग -६.१ टक्के
- वीज निर्मिती- २२.५
हेही वाचा-भीमा कोरेगाव प्रकरण : सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज
लॉकडाऊनमुळे उत्पादन क्षेत्राला गतवर्षी बसला होता फटका-
- गतवर्षी कोरोना महामारीमुळे औद्योगिक उत्पादनात मार्चमध्ये १८.७ टक्क्यांची घसरण झाली होती. ही घसरण ऑगस्ट २०२० पर्यंत कायम राहिली होती.
- गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२० ला टाळेबंदी संपूर्ण देशात जाहीर केली होती. त्यामुळे देशातील औद्योगिक उत्पादनाला मोठा फटका बसला होता.
- मार्च २०२० मध्ये औद्योगिक उत्पाद क्षेत्रात २२.८ टक्क्यांची घसरण झाली होती.
- वर्ष २०२०-२१ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ८.६ टक्क्यांची घसरण झाली होती. तर वर्ष २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादन हे ०.८ टक्के होते.