नवी दिल्ली: नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढ़िया (Arvind Panagariya former Vice Chairman NITI Aayog) यांनी मंगलवारी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy Recovered) महामारीमुळे निर्माण झालेल्या व्यत्ययानंतर बऱ्याच प्रमाणात सावरली आहे आणि ही सुधारणा पुढे सुद्धा सुरु राहू अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ते म्हणाले की, येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था 7 ते 8 टक्के वाढीचा दर प्राप्त करेल. तसेच पनगढ़िया यांनी सल्ला दिला की केंद्र सरकारला आता 2022-23 या वित्तीय वर्षात वित्तीय तूट अर्धा ते एक टक्क्यांनी कमी करण्याचे संकेत द्यायला हवेत.
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञानी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेने कोविडच्या अगोदरच्या जीडीपीची पातळीवर परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे. आता फक्त खाजगी वापर अजूनही त्याच्या प्री-कोविड-19 पातळीच्या खाली आहे. त्यांनी सांगितले की, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर 9.2 (India's GDP growth rate)टक्के असेल. पनगढ़िया म्हणाले की, हा आकडा इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत जास्त असून देशभरात सुधारणा झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी घसरली होती.
कोलंबिया विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढ़िया म्हणाले की, सरकारने आता वित्तीय तूट कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. कारण असे करण्यात अपयश आले तर पुढच्या पिढीच्या डोक्यावर कर्जाचे मोठे ओझे पडेल.