ETV Bharat / business

देशात विकासाची असमान संधी! 'या' यादीत भारताचा ७६ वा क्रमांक

जागतिक आर्थिक मंचाची (डब्ल्यूइएफ) ५० वी वार्षिक बैठक होण्यापूर्वी मंचाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात विविध देशांच्या जागतिक सामाजिक गतीशील सूचकांची (ग्लोबल सोशल मोबिलीटी इन्डेक्स) आकडेवारी दिली आहे.

global Social Mobility Index
जागतिक सामाजिक गतीशील सूचकांक
author img

By

Published : Jan 20, 2020, 7:43 PM IST

नवी दिल्ली - जगातील ८२ देशांच्या जागतिक सामाजिक गतीशील सूचकांच्या यादीत भारताचा ७६ वा क्रमांक आहे. ही यादी जागतिक आर्थिक मंचाने प्रसिद्ध केली आहे. या यादीत डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे.

जागतिक आर्थिक मंचाची (डब्ल्यूइएफ) ५० वी वार्षिक बैठक होण्यापूर्वी मंचाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात विविध देशांच्या जागतिक सामाजिक गतीशील सूचकांची (ग्लोबल सोशल मोबिलीटी इन्डेक्स) आकडेवारी दिली आहे. आर्थिक समानतेला चालना देण्यासाठी सोशल मोबिलीटी हा महत्त्वाचा घटक आहे. सोशल मोबिलीटीत १० टक्के वाढ झाल्याने सामाजिक दृढसंबध आणि जागतिक अर्थव्यवस्थेला ५ टक्क्यांची चालना मिळेल, असा डब्ल्यूइएफने म्हटले आहे. मात्र, काही देशांच्या अर्थव्यवस्था या सोशल मोबिलिटीला पोषक असल्याच्या योग्य स्थितीत असल्याचे डब्ल्यूइएफने म्हटले आहे.

हेही वाचा-शेअर बाजारात ४१६ अंशाची घसरण; कोटक बँकेच्या शेअरला ५ टक्क्यांचा फटका

सोशल मोबिलीटीचे हे आहेत दहा निकष-
आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, काम आणि संरक्षण आणि संस्था, त्यांचे वेतन, सामाजिक हितसंरक्षण असे सोशल मोबिलिटीचे निकष आहेत. भारताचे सामाजिक संरक्षणात (७६ व्या स्थानी) आणि योग्य वेतनाच्या वाटपात (७९ व्या स्थानी) सुधारणा करण्याची गरज जागतिक आर्थिक मंचाने अहवालात व्यक्त केली आहे.

हेही वाचा-युनिटेक कंपनीच्या व्यवस्थापनावर केंद्र सरकारचे येणार नियंत्रण, कारण...

सर्वांना समान संधी असलेल्या समाजाची निर्मिती करण्याची गरज आहे. यामधून सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी कोणतीही असली त्यांना विकासाची समान संधी मिळायला हवी, असे जागतिक आर्थिक मंचाने म्हटले आहे. त्यामधून शेकडो अब्ज डॉलरने आर्थिक विकासाच्या वृद्धीला चालना मिळेल, असा विश्वास आर्थिक मंचाने अहवालातून व्यक्त केला आहे.

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.