नवी दिल्ली - कोरोनाविरोधातील जपानची लढाई एक उदाहरण ठरले आहे. कोरोनाचा सर्वात वाईट परिणाम झालेल्या देशांच्या यादीत जपानचा दुसरा क्रमांक होता. सध्या, जपान कोरोनाच्या फटका असलेल्या देशांच्या यादीत 36 व्या क्रमांकावर आहे. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी आणि रुग्णांची संख्या कमी करण्यात जपानने पार केलेला प्रवास हा लक्षणीय आहे.
जपानने कोरोनावर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात विदेशी माध्यमांच्या प्रतिनिधींना आणि आंतरराष्ट्रीय संसर्गतज्ञांना यश आले नाही. आगामी टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने जपान सरकार कोरोना रुग्णांची संख्या लपवत असल्याचा आरोप काही तज्ञ करत आहेत.
प्रत्यक्षात, जपानमध्ये कोरोना रोगामुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्या कमी आहे.
होककायडो विद्यापिठातील इंटरनॅशनल पॉलिटिक्सचे प्राध्यापक काजूटू सुझुकी म्हणाले की, जपानने गटावर आधारित मॉडेल राबवले आहे. हे मॉडेल संसर्गाच्या अभ्यासानंतर तयार करण्यात आले आहे.
डायमंड प्रिन्सेस हे क्रुझ योकोहामा बंदरावर 3 फेब्रुवारीला आल्यानंतर पहिल्यांदा मॉडेल राबविण्यात आले. या मॉडेलमध्ये प्रत्येक गटातील संसर्गाचे स्त्रोत शोधून काढण्यात येतात. या मॉडेलमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी ठेवण्यात जपानला यश आले आहे.
चीन हा जपानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. चीनमधील कारखाने बंद पडल्यानंतर जपानमधील उत्पादन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. जपानमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना जपान मोठ्या प्रमाणात सवलत देत आहे. ही भारतासाठी आणि देशातील कंपन्यांसाठी खूप दिलासादायक बाब आहे. जपानमधील निप्पॉन या कंपनीने विदेशातील गुंतवणुकीसाठी 2.2 अब्ज डॉलर बाजूला काढून ठेवले आहेत. भारत आणि जपानमध्ये चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. त्यामुळे भारताला गुंतवणुकीच्या संधी घेता येणे शक्य होणार आहे.