ETV Bharat / business

स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची देशाला मिळाली पहिली यादी, पण... - AEOI

तज्ज्ञांच्या माहितीनुसार विदेशात बेहिशोबी मालमत्ता असलेल्या लोकांविरोधात कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे. कारण स्वित्झर्लंड सरकारकडून मिळालेल्या यादीत खातेदारांच्या ठेवी आणि आर्थिक व्यवहाराची संपूर्ण माहिती आहे.

संग्रहित - स्विस बँक
author img

By

Published : Oct 7, 2019, 6:46 PM IST

Updated : Oct 7, 2019, 7:15 PM IST

नवी दिल्ली - स्विस बँकेने भारतीय खातेदारांची माहिती देणारी पहिली यादी देशाला दिली आहे. ही यादी नव्या स्वयंचलित माहिती आदान-प्रदान करारानुसार देण्यात आली आहे. काळ्या पैशाविरोधात लढ्यातील हा महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे. मात्र, यादीमधील माहिती आंतरराष्ट्रीय करारानुसार गोपनीय राहणार आहे.

स्विस संघराज्य प्राप्तिकर प्रशासनाने (एफटीए) भारतासह ७५ देशांना खातेदारांची माहिती दिली आहे. यामध्ये जागतिक मानांकनानुसार खातेदारांची वित्तीय माहिती देण्यात आल्याचे एफटीएच्या प्रवक्त्याने सांगितले. पुढील माहिती सप्टेंबर २०२० मध्ये देण्यात येईल, असे प्रवक्त्याने सांगितले. देशाला पहिल्यांदाच स्विस प्रशासनाकडून स्वयंचलित माहिती देवाण-घेवाणाची (एईओआय) आकृतीबंधातून माहिती मिळाली आहे. यामध्ये सध्या असलेल्या खातेदारांसह २०१८ मध्ये खाती बंद झालेल्या भारतीयांची माहिती देण्यात आलेली आहे. मात्र, ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येणार आहे. याबाबत एफटीएच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

हेही वाचा-रोजगाराबाबत परिस्थिती अधिक वाईट झाल्याचे ५२ टक्के जनतेचे मत : आरबीआय सर्व्हे

काय आहे यादीमध्ये ?
खातेदारांची ओळख, त्यांच्या खात्याची आणि वित्तीय स्थितीची माहितीचा यादीमध्ये समावशे आहे. खातेदाराचे नाव, पत्ता, रहिवासी राज्य, प्राप्तिकर ओळख क्रमाक, तसेच संबंधित वित्तीय संस्थेची माहिती, त्यावरील जमा रक्कम आणि भांडवली उत्पन्न अशा माहितीही देण्यात आली आहे. यादीत बहुतांश उद्योगपती, दक्षिण-पूर्व आशिया, अमेरिका आणि इंग्लंड स्थायिक झालेले अनिवासी भारतीय यांचा समावेश असल्याचे विविध अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा-पीएमसी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे मुंबईत छापे ; वाधवानने राज्यातील वरिष्ठ नेत्यांना घरे दिली 'गिफ्ट'

स्वित्झर्लंड सरकारने अशा प्रकारची ६३ देशांना माहिती दिली आहे. मात्र, १२ देशांनी गोपनीयता आणि डाटा सुरक्षेची मानके पूर्ण केल्याने त्यांना माहिती देण्यात आली नाही. एफटीएने सुमारे ७ हजार ५०० संस्थांकडून माहिती गोळा केली आहे. यामध्ये बँक, ट्रस्ट आणि विमा कंपन्यांचा समावेश आहे. पुढील यादी भारतीयांना आंतरराष्ट्रीय करारानुसार नऊ महिन्यात दिली जाणार आहे.

बेहिशोबी मालमत्ता असलेल्या लोकांविरोधात कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार

तज्ज्ञांच्या माहितीनुसार विदेशात बेहिशोबी मालमत्ता असलेल्या लोकांविरोधात कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे. कारण त्यामध्ये खातेदारांच्या ठेवी आणि आर्थिक व्यवहाराची संपूर्ण माहिती आहे. सुमारे १०० भारतीयांनी २०१८ पूर्वी स्विस बँकेतील खाती बंद केली आहेत. यामध्ये वाहनांचे सुट्टे भाग, रसायन, कापड उद्योग, स्थावर मालमत्ता, हिरे, दागिने आणि स्टील उत्पादन अशा क्षेत्रातील उद्योगपतींचा समावेश आहे. काळ्या पैशांविरोधात जगभर कारवाई सुरू असताना अनेक भारतीयांनी स्विस बँकेतून खाते बंद केली असावीत, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण; येस बँकेचे ८ टक्क्यांनी वधारले शेअर

Intro:Body:

dummy

Conclusion:
Last Updated : Oct 7, 2019, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.