नवी दिल्ली - व्यापार संबंध दृढ करण्याच्या हेतूने भारत आणि मेक्सिको पर्यटनाला चालना देण्याचे आणखीन मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या व्यापार-गुंतवणूक आणि सहकार (बीएचएलजी) या भारत-मेक्सिको द्विपक्षीय गटाच्या पाचव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या निवेदनात म्हटले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी ऑडिओ-व्हिज्युअल को-प्रॉडक्शन, द्विपक्षीय गुंतवणूकीचा करार, शेती उत्पादनांना बाजारपेठेत प्रवेश आणि सहकार्यात तांत्रिक अडथळे यासारख्या अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच भारत आणि मेक्सिकोचे पर्यटन वाढवण्यासाठी, उभय देशातील लोकांमधील संपर्क वाढविण्यासाठी विविध मार्ग शोधण्यासाठी चर्चा केली.
हेही वाचा - 15 डिसेंबरपासून 'याहू'चा गुडबाय; मेल पाठवणे, स्वीकारणे बंद होणार
त्यात पुढे असेही म्हटले आहे की, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यसेवा, कृषी उत्पादने, मत्स्यव्यवसाय, खाद्य प्रक्रिया आणि एरोस्पेस उद्योग इ. मधील सहकार्याद्वारे भारत आणि मेक्सिको दरम्यान द्विपक्षीय व्यापार संबंधांचा विस्तार आणि विविधता वाढविण्यावर सहमती दर्शवण्यात आली आहे.