नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाकडून ७ जूनला नवीन प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टल लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याचे प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टल हे १ जून ते ६ जून या सहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. याविषयीची माहिती प्राप्तिकर विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
प्राप्तिकर अधिकारी हे प्राप्तिकर फायलिंग पोर्टलमधून विविध माहिती घेण्यासाठी वापर करतात. तसेच प्राप्तिकराचे फायलिंग करण्यासाठी, परतावा पाहण्यासाठी व तक्रारी दाखल करण्यासाठी करदाते वेबसाईटचा वापर करतात. सहा दिवसांसाठी प्राप्तिकर फायलिंग पोर्टल बंद राहणार असल्याने त्याचा वापर करू नये, असा प्राप्तिकर अधिकाऱ्यांनाही सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा-फेसबुकने अमेरिकेपाठोपाठ भारतातही सुरू केले 'कोव्हिड १९ घोषणा' टूल
प्राप्तिकर विभागाने तक्रारीबाबत सुनावणी अथवा त्याबाबत पालन करण्याचे काम १० जूननंतर करावे असे निर्देश परिपत्रकात दिले आहेत. तसे करदात्यांना प्रतिसाद देण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे.
हेही वाचा-ईपीएफओ धारकाचा मृत्यू झाल्यास ७ लाखापर्यंत रक्कम मिळणार
तातडीचे काम १ जूनपूर्वी करण्याची अधिकाऱ्यांना विनंती
नवीन वेबसाईटची व्यवस्था सुरू करण्यासाठी सध्याचे ई-फायलिंग पोर्टल विकास अधिकाऱ्यांस करदात्यांना सहा दिवस उपलब्ध होणार नाही. या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान विभागाने सर्व अधिकाऱ्यांना तातडीचे काम आणि प्राप्तिकरदात्यांशी १ जूनपूर्वी संवाद साधण्याची विनंती केली आहे. १ जूनंतर सहा दिवस वेबसाईट बंद असल्याने महत्त्वाचे काम रखडू नये, यासाठी ही विनंती करण्यात आलेली आहे.