ETV Bharat / business

कोरोनाच्या लढ्याकरता भारताच्या उपाययोजनांना आयएमएफ करणार मदत - कोरोना परिणाम

भारतीय रिझर्व्ह बँक वित्तीय स्थिरतेसाठी उपाययोजना करत आहे. तसेच महामारीत अर्थव्यवस्था ढासळण्याच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना मदत करणार असल्याचे आयएमएफच्या आशिया आणि प्रशांत विभागाचे संचालक चँग योंग री यांनी सांगितले.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Apr 16, 2020, 2:53 PM IST

वॉशिंग्टन - कोरोनाच्या संकटात भारताने राबविलेल्या धोरणाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बळकट पाठिंबा देणार आहे. अभूतपूर्व अशा संकटात आरोग्याच्या मूलभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे आयएमएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक वित्तीय स्थिरतेसाठी उपाययोजना करत आहे. तसेच महामारीत अर्थव्यवस्था ढासळण्याच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना मदत करणार असल्याचे आयएमएफच्या आशिया आणि प्रशांत विभागाचे संचालक चँग योंग री यांनी सांगितले.

जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताने आरोग्याची समस्या सोडविण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. तसेच गरज असेल तर टाळेबंदी वाढवावी, असेही री यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोनाचा फटका : आशियाचा २०२० मध्ये शून्य टक्के विकासदर - आयएमएफ

कोरोनामुळे देशभरात आजपर्यंत एकूण ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हजार ३८० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. वित्तीय मंत्रालयाने २६ मार्चला १.७० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. केंद्र सरकारने कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी ३ मेपर्यंत टाळेबंदी वाढविली आहे.

हेही वाचा-भारतीय चलनाचे विक्रमी अवमूल्यन : डॉलरच्या तुलनेत मोजावे लागणार ७६.८२ रुपये!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.