वॉशिंग्टन - केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाय करूनही हे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे चित्र समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताच्या अर्थव्यवस्थेमधील घसरणीने आश्चर्य व्यक्त केले आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर (जीडीपी) ४.८ टक्के राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ऑक्टोबरमध्ये भारताचा जीडीपी ६.१ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. भारताच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेने जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरणार असल्याचेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अहवालात म्हटले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदरही २०२१ मध्ये ०.२ टक्क्यांनी घसरून ३.४ टक्के राहील, असे आयएमएफने म्हटले आहे.
हेही वाचा-युनिटेक कंपनीच्या व्यवस्थापनावर केंद्र सरकारचे येणार नियंत्रण, कारण...
पुढील आर्थिक वर्षात देशाचा विकासदर हा १ टक्क्यांनी वाढून ५.८ टक्के राहील, असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अंदाज व्यक्त केला आहे. विकासदर घसरणार असला तरी भारत हा चीननंतर सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था राहील, असे आयएमएफने म्हटले आहे.