ETV Bharat / business

१२ हजार २६० कोटींची विदेशात अघोषित संपत्ती, प्राप्तीकर विभागाच्या ३८० जणांना नोटीस - मराठी बिझनेस न्यूज

प्राप्तीकर विभागाकडून  काळा पैसा बाळगण्याच्या प्रकरणात मालमत्तेची झडती, शोध (सर्च), चौकशी, जप्ती, दंड लावणे व गुन्हे दाखल करणे अशा कारवाया करण्यात येतात.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Jun 25, 2019, 1:23 PM IST

नवी दिल्ली - काळा पैसा बाळगणाऱ्यांविरोधात सरकार काय कारवाई करते, हा अनेकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा विषय ठरला आहे. सरकारने काळा पैसा बाळगणाऱ्याविरोधात काय कारवाई केली, याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत दिले. प्राप्तीकर विभागाने अघोषित संपत्तीप्रकरणी ३८० जणांना नोटीस पाठविल्याचे सीतारमण यांनी सांगितले. नोटीस पाठविलेल्या व्यक्तींकडे १२ हजार २६० कोटींहून अधिक अघोषित संपत्ती असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली.

प्राप्तीकर विभागाने अघोषित विदेशी संपत्ती आणि मालमत्ता कायद्याअंतर्गत (विदेशी काळा पैसा) कारवाया केल्या आहेत. यामध्ये ३० एप्रिल २०१९ पर्यंत ६८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काळा पैसा (ब्लॅक मनी) कायद्यानुसार ३८० जणांना नोटीस दिल्याचे निर्मला सीतारामण सांगितले.

प्राप्तीकर विभागाकडून काळा पैसा बाळगण्याच्या प्रकरणात मालमत्तेची झडती, शोध (सर्च), चौकशी, जप्ती, दंड लावणे व गुन्हे दाखल करणे अशा कारवाया करण्यात येतात.

प्राप्तीकर विभागाने विविध ९८३ उद्योग समुहांच्या २०१८-२०१९ मध्ये झडती घेतल्या आहेत. विविध प्रकरणातील १ हजार ५८४ कोटी रुपयांची मालमत्ता प्राप्तीकर विभागाने जप्त केली. यापूर्वी २०१७-१८ मध्ये ९९३ कोटी रुपयांची मालमत्ता काळा पैसा बाळगणाऱ्यांकडून जप्त केली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.