ETV Bharat / business

'सरकारला अर्थव्यवस्थेवरील टीका ऐकायची नाही' - Rahul Bajaj

मागणी आणि विकासदराला चालना देण्यासाठी उपाय करण्याचा संदेश सरकारपर्यंत पोहोचला असेल, अशी आशा आहे, असे किरण मुझुमदार शॉ यांनी ट्विटमध्ये म्हटले.

Kiran Mazumdar Shaw
संग्रहित - किरण मुझूमदार शॉ
author img

By

Published : Dec 2, 2019, 5:35 AM IST

नवी दिल्ली - उद्योगपती राहुल बजाज यांच्यापाठोपाठ बिकॉनच्या व्यवस्थापकीय संचालक किरण मुझूमदार यांनीदेखील सरकारवर टीका केली आहे. सरकारला अर्थव्यवस्थेबाबत कोणतीही टीका ऐकायची नाही, असे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.

सरकारवर टीका करण्याला लोक घाबरतात, अशी उद्योगपती राहुल बजाज यांनी टीका केली होती. त्यानंतर किरण मुझूमदार यांनीही ट्विट करत सरकारवर टीका केली. मागणी आणि विकासदराला चालना देण्यासाठी उपाय करण्याचा संदेश सरकारपर्यंत पोहोचला असेल, अशी आशा आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. आम्हाला वाळीत टाकल्यासारखे आहे. त्यामुळे सरकारला आमची अर्थव्यवस्थेवरील टीका ऐकायची नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.

हेही वाचा-ई-सिगरेट बंदीच्या घोषणेवरून किरण मुझुमदार शॉ यांचा आक्षेप; सीतारामन यांनी 'हे' दिले उत्तर

बजाज यांनी शनिवारी मुंबईमधील कार्यक्रमात भीतीदायक वातावरण असल्याची टीका केली. सरकारवर टीका करायला लोकांना भीती वाटते. सरकारकडून टीका विचारात घेतली जाईल, यावर लोकांचा विश्वास नाही, असेही बजाज यांनी म्हटले. यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या. सरकारी यंत्रणेकडून छळवणूक होत असल्याने भीतीत राहत असल्याने अनेक उद्योगपतींनी आपल्याला सांगितल्याचे नुकतेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते.

हेही वाचा-जीडीपी ५ टक्के ही सरकारची जागे होण्याची वेळ - किरण मुझुमदार शॉ

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.