नवी दिल्ली - वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन हे जानेवारीत १.१ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटीचे संकलन हे १ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.
महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी महसूल संकलनाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. देशातील (डोमेस्टिक) जीएसटीचे संकलन हे ८६.४५३ कोटी रुपये आहे. तर आयजीएसटीचे २३,५९७ कोटी रुपये संकलन झाले आहे. डिसेंबरमध्ये जीएसटीचे १.०३ लाख कोटी रुपये संकलन झाले होते.
हेही वाचा-शनिवार सुट्टीचा दिवस असूनही मुंबई शेअर बाजार राहणार खुला, कारण...
देशातील जीएसटीचे संकलन हे ११.५ टक्क्यांनी वाढले आहे. तर आयजीएसटीचे संकलन हे ६ टक्क्यांनी कमी झाल्याचे सूत्राने सांगितले. केंद्र सरकारने चालू महिन्यात १.१ लाख कोटी रुपये जीएसटी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. वाढती वित्तीय तूट आणि कर संकलनाचे घटलेले प्रमाण लक्षात घेतला केंद्र सरकारने कर संकलनासाठी विविध प्रयत्न केले आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्री अर्थव्यवस्थेच्या आव्हानांवर मात करणार?