दावोस - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (डब्ल्यूडब्ल्यूईएफ) प्रमुख ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी भारताच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्था हा तात्पुरता परिणाम दिसत असल्याचे म्हणाले. येत्या काळात देशाची अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. त्या 'डब्ल्यूडब्ल्यूईएफ २०२०' मध्ये बोलत होत्या.
आयएमएफने 'जागतिक आर्थिक दृष्टीक्षेप' हा अहवाल ऑक्टोबर २०१९ मध्ये जाहीर केला. त्यामधील अंदाजाच्या तुलनेत जानेवारी २०२० मध्ये जगाची स्थिती चांगली असल्याचे आयएमएफच्या प्रमुख ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी म्हटले. व्यापार तणाव निवळल्यानंतर अमेरिका-चीनमध्ये पहिल्या टप्प्यातील होणारा करार आणि करात होणारी कपात अशी कारणांनी सकारात्मक स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ३.३ टक्के विकासदर हा उत्तम नसल्याचे त्यांनी म्हटले.
-
.@KGeorgieva: I see four “lows” as concerns for the global economy: low growth, low productivity, low interest rates and low inflation. #WEF20 pic.twitter.com/0bnWHB8cFc
— IMFLive (@IMFLive) January 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">.@KGeorgieva: I see four “lows” as concerns for the global economy: low growth, low productivity, low interest rates and low inflation. #WEF20 pic.twitter.com/0bnWHB8cFc
— IMFLive (@IMFLive) January 24, 2020.@KGeorgieva: I see four “lows” as concerns for the global economy: low growth, low productivity, low interest rates and low inflation. #WEF20 pic.twitter.com/0bnWHB8cFc
— IMFLive (@IMFLive) January 24, 2020
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प २०२० : अधिक आणि योग्य असा खर्च करा!
अद्यापही मंदावलेला वृद्धीदर आहे. वित्तीय धोरण अधिक आक्रमक असावे, अशी आमची इच्छा आहे. संरचनात्मक सुधारणा व्हाव्यात आणि अधिक गतीशीलता हवी, असेही आएमएफच्या व्यवस्थापकीय संचालिका जॉर्जिया यांनी सांगितले. मोठी बाजारपेठ असलेल्या भारताच्या विकासदराचा अंदाज कमी केला आहे. इंडोनेशिया आणि व्हिएतनामसारखे देश आणखी सुधारणा करतील, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली.
हेही वाचा-नोव्हेंबरमध्ये १४ लाख ३३ हजार नव्या नोकऱ्यांची निर्मिती; ईएसआयसीचा दावा
जागतिक अर्थव्यवस्थेसमोर दीर्घकाळापर्यंतच्या उत्पादकतेमधील असलेला कमकुवतपणा आणि कमी महागाई ही जोखीम आहे. दरम्यान, जागतिक आर्थिक मंचाने आयएमफच्या प्रमुख क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा आणि आफ्रिकन रेनबोर मिनरल्सचे चेअरमन पॅट्रीस मॉटसेप यांची आयएमफ ट्रस्टच्या बोर्डावर निवड करण्यात आली.