नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगांशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. प्रशासन हे सर्व सार्वजनिक संस्थांचे खासगीकरण करण्यासाठी बांधील आहे. ते गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापनाने (डीआयपीएएम) आयोजित केलेल्या खासगीकरण विषयावर बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उद्योगांना आणि व्यवसायांना सहकार्य करण्याचे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, हे व्यवसाय स्वत:चे असावेत अशी अट नाही. कमीत कमी चार रणनीतीचे क्षेत्र राहणार आहे. सार्वजनिक संस्थांचे रोखीकरण आणि आधुनिकीकरण करणे हे केंद्र सरकारचे धोरण आहे. उद्योगांशी सरकारचा काहीही संबंध नाही, असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाकडून औषधी कंपन्यांकरता पीएलआय योजना मंजूर
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, सार्वजनिक उद्योगांना वित्तीय सहकार्य केल्याने अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण होतो. केवळ वारसा आहे म्हणून सार्वजनिक उद्योग चालवू नयेत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. अनेक सार्वजनिक उद्योग हे तोट्यात आहेत. त्यांना प्राप्तिकरदात्यांच्या पैशांतून मदत केली जाते. केंद्र सरकारकडे १०० हून अधिक मालमत्ता आहेत. त्यामधून २.५ लाख कोटी रुपयांचे पैसे मिळविण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
हेही वाचा-खासगी बँकांना सरकारी व्यवहार करण्याची परवानगी-केंद्राचा निर्णय