नवी दिल्ली - पेट्रोलच्या किमतीने मुंबईत आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९७ रुपये आहे. तर डिझेलचा दर ८८ रुपये प्रति लिटर आहे.
देशात पेट्रोलचे दर प्रति लिटर ३९ पैशांनी वधारले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ३७ पैशांनी वधारले आहेत. देशात सलग १२ व्या दिवशी पेट्रोलचे दर वाढले आहेत. सरकारी विपणन कंपन्यांकडून रोज आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे देशातील पेट्रोल व डिझेलचे इंधन दर निश्चित केले आहेत.
हेही वाचा-इंधन दरवाढीचा उच्चांक: दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९०.१० रुपये
- दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ९०.५८ रुपये आहेत. तर मुंबईत दर प्रति लिटर ९७ रुपये आहे.
- डिझेलचे दर दिल्लीत प्रति लिटर ८०.९७ रुपये आहेत. तर मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर ८८.०६ रुपये आहेत
- या आठवड्यात जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६५ डॉलरवर पोहोचले आहेत.
- अमेरिकेत उर्जा उत्पादनात मोठी घसरण झाल्याने तिथे स्थिती वाईट आहे.
- देशात पेट्रोलचे दर १२ दिवसांमध्ये प्रति लिटर ३.६३ रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ३.८४ रुपयांनी वाढले आहेत.
- राजस्थान, मध्यप्रदेशसह काही राज्यांत पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत. या राज्यात व्हॅटचे दरही कमी आहेत.
हेही वाचा-अॅमेझॉनच्या ई-कॉमर्स पोर्टलवर बंदी आणावी-सीएआयटीची मागणी
या कारणाने वाढले कच्च्या तेलाचे दर-
- कोरोनाच्या संकटामधून जगभरातील अर्थव्यवस्था सावरत असताना कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे.
- सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या बॅरलचे कमी उत्पादन केले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठ्याचे प्रमाण कमी झाले आहे.