मुंबई - देशातील विदेशी गंगाजळीने (फॉरेन एक्सचेंज) पहिल्यांदाच 600 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवड्यात 4 जूनपर्यंत 6.842 अब्जने विदेशी गंगाजळीने वाढ झाली आहे. त्यानंतर विदेशी गंगाजळीने आजतागायत सर्वाधिक राहिली आहे. विदेशी चलन मालमत्तेत (फॉरेन करन्सी असेट्स-एफसीए) वाढ झाल्याने विदेशी गंगाजळीत वाढ झाल्याचे आरबीआयच्या आठवडाभरातील आकडेवारीतून दिसून आले आहे.
मागील आठवड्यात 28 मे 2021 अखेर विदेशी गंगाजळी 5.271 अब्ज डॉलरने वाढून 598.165 अब्ज डॉलर झाली होती. तर एफसीएचे प्रमाण 7.362 अब्ज डॉलरने वाढून 560.890 अब्ज डॉलर आहे. आरबीआयकडील सोन्याच्या साठ्यात घसरण झाली आहे.
हेही वाचा-आम्ही वित्तीय बाबतीत तज्ज्ञ नाही- सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कर्जफेड मुदतवाढीची याचिका
सोन्याच्या साठ्यात घट
आरबीआयकडील सोन्याचा साठा 502 दशलक्ष डॉलरने घसरून 37.604 अब्ज डॉलर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधून स्पेशल ड्राईंग राईट्सचे अधिकार हे 1 दशलक्ष डॉलरने घसरून 1.513 अब्ज डॉलर आहेत. आयएमएफच्या साठा ठेवण्याचे भारताचे प्रमाण 16 अब्ज डॉलरने कमी होऊन 5 अब्ज डॉलर झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले.
हेही वाचा-आयएल अँड एफएसमध्ये १ लाख कोटींचा घोटाळा; चेअरमन पार्थसारथीला चेन्नई पोलिसांकडून अटक
आरबीआयकडून केंद्राच्या विदेशी गंगाजळीचे व्यवस्थापन
आरबीआय ही केंद्र सरकारच्या विदेशी गंगाजळीचे व्यवस्थापन करते. ही आकडेवारी आरबीआय दर आठवड्याला जाहीर करते. सरकारकडील विदेशी गंगाजळीत विदेशी चलन मालमत्ता (एफसीएएस), सोन्याचा साठा, राखीव निधीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील देशाचे स्थान यांचा समावेश होतो.